Nashik Krishi Kumbh 2026 | तंत्रज्ञान हाच शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

Nashik Krishi Kumbh 2026 | जिल्हाधिकारी प्रसाद : कृषी कुंभचे जल्लोषात उद्घाटन, चार दिवस विविध कार्यक्रम
Fake Crop Insurance
बनावट पीकविमा आढळल्यास फौजदारी कारवाई; संबंधितांचा आधार क्रमांक पाच वर्षे काळ्या यादीत जाणारFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतकरी, उत्पन्नवाढीसाठी शेतमजुरांच्या राज्यशासन प्रयत्नशील आहे. शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

Fake Crop Insurance
Nashik Grape Farmers | कडक उन्हामुळे द्राक्षाला सफेद कापडाचे आच्छादन

जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, 'आत्मा' आणि माविमच्या संयुक्त विद्यमाने कृषी कुंभचे आयोजन गुरुवार (दि.१२) पासून यूथ फेस्टिव्हल मैदानावर सुरू झाले. त्याचे उद्घाटन कृषी क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते झाले.

यावेळी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, महिला शेतकरी मेधा बोरसे, विमलबाई आचारी, सुनीता खेमनार, श्रद्धा कासार्डे, संगीता सांगळे, पूनम डोखळे, लक्ष्मी मोरे उपस्थित होत्या.

तत्पूर्वी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनीही कृषी कुंभ प्रदर्शनास भेट दिली. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, प्रत्येक गावातील शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी काश्मीरपासून ते केरळपर्यंतच्या भागातील प्रगतिशील शेतकरी, तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी कुंभमध्ये मिळालेली माहिती आपापल्या गावातील शेतकऱ्यांना द्यावी. तसे झाल्यास कृषी कुंभमध्ये मिळालेल्या माहितीचे सकारात्मक परिणाम दिसून येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Fake Crop Insurance
Bristol University Scholarship | मेळघाटातील विद्यार्थी घेणार ब्रिस्टल विद्यापीठात धडे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे. त्यामुळे कृषी कुंभचे उद्घाटन जिल्ह्यातील कृषी पुरस्कारप्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

काय आहे कृषी कुंभमध्ये?

  • कृषी विभागाशी निगडित १६ विभागांचे ४०० स्टॉल्स

  • लागवड, मशागत, मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

  • कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान वापराविषयी माहिती

  • आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध दालने

  • ड्रोन तंत्रज्ञान, 'फसल' व 'फायलो' कंपनीचे स्मार्ट सेन्सर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news