नाशिक : खारीपाडा येथे वनविभागाच्या राखीव क्षेत्रावर शॉटसर्किटने आग

अनेक झाडे नष्ट, काही पक्षांचाही मृत्यू
Nashik news
खारीपाडा येथे वनविभाच्या आरक्षित क्षेत्रावर शॉटसर्किटने आग लागली.
Published on
Updated on

देवळा : तालुक्यातील खारीपाडा (महात्मा फुले नगर ) येथे वनविभाच्या राखीव क्षेत्रावर शॉटसर्किटने आग लागली. या आगीत जंगल क्षेत्रावर असलेली अनेक झाडे नष्ट झाली तर काही पक्षांचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.७) दुपारी १२ च्या सुमारास घडली. नगरपंचायतीच्या अग्निशामक दल तसेच स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नाने दुपारी चारच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, देवळा तालूक्यात खारीपाडा ( महात्मा फुलेनगर ) येथे वनविभागाचे मोठ्या प्रमाणावर राखीव जंगल क्षेत्र असून याला आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास शॉट सर्किटने आग लागली. कडक ऊन व पाला-पाचोळामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. वेळीच वनरक्षक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना घटनेची माहिती दिल्यावर लागलीच घटनस्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. तसेच आग विझविण्यासाठी देवळा नागरपंचायतीच्या अग्निशामक पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. शर्तीच्या प्रयत्नानंतर दुपारी चारच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात आग्निशामक दलाला यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news