Nashik Fraud News | एरंडने नऊ लोकांकडून उकळले १३ लाख

फसवणुकीचा गुन्हा दाखल : घरातून बनावट नियुक्तिपत्रही केले जप्त
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : गोरगरीब महिलांचे लैंगिक शोषण करीत, त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या नराधम रवींद्र एरंडेचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्याने ९ लोकांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल १३ लाख ८० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुरुवारी (दि. ९) रात्री उशिरा त्याच्याविरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याशिवाय एरंडेच्या घरातून पोलिसांनी बनावट नियुक्तिपत्रही हस्तगत केले.

आदिवासी विभागात नोकरीचे आमिष दाखवून त्याने ही फसवणूक केली आहे. यासाठी त्याने स्वतःचे नावदेखील बदलले. राजेंद्र दयाराम सबनीस हे खोटे नाव आणि ओळख सांगून, त्याने मी आदिवासी विभागात नोकरीला असल्याची फिर्यादी महिलेला बतावणी केली होती. तसेच तुलादेखील नोकरीला लावतो, असे सांगत पाच लाख रुपये मागितले होते. त्या महिलेने दोन लाख रुपये दिले. मात्र, नोकरीबाबत कोणत्याच हालचाली होत नसल्याने, तिने बऱ्याचदा एरंडेकडे विचारणा केली.

दरवेळी त्याने वेगवेगळी आश्वासने देत, महिलेची दिशाभूल केली. मात्र, अश्लील व्हिडिओ प्रकरणी जेव्हा एरंडेविरोधात गुन्हा दाखल झाला, तेव्हा फिर्यादी महिलेने एरंडेचा फोटो दूरचित्रवाणीवर बघितला. त्यानंतर तिने सातपूर ठाणे फिर्याद दिली. दरम्यान, त्याने इतर आठ लोकांचीही फसवणूक केली असून, तेदेखील पुढे आले आहे. या सर्वांची मिळून १३ लाख ८० हजारांची फसवणूक केली. पोलिसांनी एरंडेच्या घराची झडती घेत, सरकारी नोकरीची तीन बनावट नियुक्तिपत्र हस्तगत केले आहेत.

घेतले रोख स्वरूपात पैसे

एरंडेने नोकरीचे आमिष दाखविताना, नऊ लोकांकडून तब्बल १३ लाख ८० हजार रुपये उकळले. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम त्याने रोख स्वरूपात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केली काय? याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, आणखीही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news