

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारांत जिल्ह्यासाठी तब्बल ५७ हजार १२० कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीचे आठ प्रकल्प समोर आले आहेत. या प्रकल्पांतून सुमारे २४ हजार १२५ रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण होणार आहे. यापूर्वी नाशिकसाठी प्रस्तावित असलेल्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त ही नवी गुंतवणूक असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नाशिकची ओळख प्रामुख्याने पारंपरिक उत्पादन उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून राहिली आहे. मात्र, प्रस्तावित नव्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठे वैविध्य निर्माण होण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, माहिती केंद्रे तसेच पुनर्वापर उद्योग यासारख्या भविष्योन्मुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होणार असल्याने नाशिकच्या औद्योगिक वाटचालीला नवी दिशा मिळू शकते. उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योग जिल्ह्यात आल्यास त्यातून केवळ थेट रोजगारनिर्मितीच नव्हे, तर स्थानिक पुरवठा साखळी, लघू व मध्यम उद्योग, सेवाक्षेत्र, वाहतूक, लॉजिस्टिक, कौशल्यविकास आणि मायक उद्योगांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांसोबतच लघु, मध्यम आणि पूरक उद्योगांचे मजबूत जाळे आहे.
नव्या मोठ्या प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योगांना पुरवठादार म्हणून संधी मिळाल्यास जिल्यातील औद्योगिक रोजगार आणि व्यवसायवाढीलाही हातभार लागू शकतो. प्रस्तावित गुंतवणुकीचा परिणाम केवळ संबंधित प्रकल्पांपुरता मर्यादित न राहता नाशिकच्या एकूण औद्योगिक परिसंस्थेवर होऊ शकतो. दरम्यान, 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमात 'निमा' अश्राश्र आशिष नाराराक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, 'आयमा' अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, वरिष्ठ एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा केली.
व्यवसायवाढीलाही हातभार लागू शकतो. प्रस्तावित गुंतवणुकीचा परिणाम केवळ संबंधित प्रकल्पांपुरता मर्यादित न राहता नाशिकच्या एकूण औद्योगिक परिसंस्थेवर होऊ शकतो. दरम्यान, 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमात 'निमा' अश्राश्र आशिष नाराराक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, 'आयमा' अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, वरिष्ठ एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा केली.
इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारांत जिल्ह्यासाठी ५७ हजार १२० कोटींची गुंतवणूक येणार ही बाब भूषणावह आहे. सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस व संरक्षण, रसायने आणि पुनर्वापर अशा उच्च तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांतील ही गुंतवणूक नाशिकच्या औद्योगिक वाटचालीला नवी दिशा देणारी ठरेल. नाशिकसह चांदवड आणि दिंडोरी या भागांत प्रकल्प प्रस्तावित असल्याने औद्योगिक विकासाचा विस्तार जिल्ह्याच्या विविध भागांत होण्याची शक्यता आहे. नाशिकला अव्वल बनवण्याचा विडा उचलला आहे.
मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, 'आयमा' अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, वरिष्ठ एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा केली.
- राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा
गुंतवणुकीचे प्रत्यक्ष प्रकल्पांत रूपांतर
सामंजस्य करारांद्वारे मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी जमीन, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, रस्ते, परवानग्या, कुशल मनुष्यबळ आणि प्रशासकीय समन्वय या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित ५७ हजार १२० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रत्यक्ष प्रकल्पांत रूपांतरित करण्यासाठी शासन, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात समन्वय आवश्यक आहे.
ठळक आकडेवारी
प्रस्तावित नवी गुंतवणूक - ५७, १२० कोटी
प्रस्तावित प्रकल्प - ८
संभाव्य रोजगारनिर्मिती - २४, १२५
यापूर्वीची प्रस्तावित गुंतवणूक ३५ हजार कोटी
प्रमुख क्षेत्रे : सेमीकंडक्टर, संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती केंद्रे, पुनर्वापर उद्योग
मुख्य उद्दिष्ट : नाशिकला प्रमुख राष्ट्रीय गुंतवणूक केंद्र विकसित करणे
नाशिकमध्ये प्रस्तावित गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार. नाशिकला देशातील प्रमुख गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी निमा सातत्याने विकासाच्या संधी शासनासमोर मांडत आहे. प्रस्तावित गुंतवणुर्कीचे प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रुपांतर होण्यासाठी उद्योग, शासन आणि प्रशासनाच्या समन्वयातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी निमा कटिबद्ध आहे.
- आशिष नहार, अध्यक्ष, निमा.