नाशिक : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी(दि.४) नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी केली. आदर्श विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी वैष्णव यांचे स्वागत केले. यावेळी वैष्णव यांनी स्टेशन वरील वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलला भेट दिली, अनेक रेल्वे सहाय्यकांची भेट घेतली आणि नाशिक स्टेशनच्या स्टेशन पुनर्विकास योजनांचा आढावा घेतला.
वैष्णव यांनी प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना, भूसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.