

मनमाड (नाशिक) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी शनिवारी (दि. १४) मनमाड रेल्वे स्थानकासह परिसराची पाहणी करत पायाभूत सुविधा उभारणीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
पांडे यांनी गुडशेड, लोको लाईन्स, कोचिंग कॉम्प्लेक्स आणि यार्ड परिसरात तपासणी केली. यावेळी मनमाड येथील अपघात मदत गाडीचे त्यांनी निरीक्षण केले. अपात्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी तयार राहण्याबाबत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच आपत्कालीन परिस्थितींमध्ये कार्यवाहीची तयारी, साधने व प्रक्रियेचे परीक्षण केले. यावेळी वरिष्ठ शाखाधिकारी तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.