

नाशिक : जिल्ह्यात उद्योगांसाठी तब्बल शेकडो हेक्टर जागा उपलब्ध असून, मोठ्या समुहाची गुंतवणूक देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह यांनी दिली. निमा आणि उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये आयुक्त कुशवाह यांनी जिल्ह्यात उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा आढावा घेतला. बैठकीसाठी अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) प्रदीप चंद्रन हे देखील उपस्थित होते.
सातपूर आणि अंबड एमआयडीसीसाठी भुयारी गटार योजना
भुयारी गटार योजनेचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समावेश व्हावा.
एलबीटी टॅक्सचा परतावा मिळावा
फायर स्टेशन महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया लवकरच
सीईटीपी प्रकल्पाच्या अडचणी सोडविणार
औद्योगिक क्षेत्रासाठी महापालिका अर्थसंकल्पात विशेष तरतुदीसाठी आयुक्तांशी चर्चा करणार.
चारशे केव्हीचे सबस्टेशन उभारणीसाठी पाठपुरावा करणार.
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर उभारणीसाठी २०० एकर जागा.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी प्रयत्न
पाडळी स्थानकाचा कुंभमेळा स्टेशन म्हणून विकास
इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब लवकरच होणार कार्यान्वित
निओ मेट्रो प्रोजेक्ट, रिंग रोडसाठी मुख्यमंत्री कार्यालयासोबत चर्चा
दर दीड महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय
उद्योगासाठी नाशिक जिल्हा पोषक असून, भविष्यात मोठ्या गुंतवणुकीसाठी पावले उचलली जातील. तसेच प्रलंबित विषयांवर तातडीने निर्णय घेणार असल्याचे आयुक्त कुशवाह यांनी स्पष्ट केले. यावेळी निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी, कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्र, जिल्ह्याच्या लॉजिस्टिक्स क्षेेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निफाड ड्रायपोर्ट प्रकल्पातील अडचणी सोडविण्यात याव्यात, आयटी उद्योगासाठी जऊळके परिसरात तीनशे एकर जागर असल्याने, याठिकाणी उद्योग यावेत आदी मागण्या केल्या. त्यावर बंगळुरू आणि हैदराबाद येथील नामवंत कंपन्यांच्या शाखा नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आयुक्त कुशवाह यांनी दिल्या. तसेच पुढील दावोस समिटमध्ये नाशिककडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी निमा सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, हेमंत खोंड, नितीन आव्हाड, सचिन कंकरेज, सतीश काेठारी उपस्थित होते.