Nashik 840 Companies Closed | नाशिकमध्ये 840 कंपन्या 'आऊट', 9,886 कंपन्या 'इन'

Nashik 840 Companies Closed | मागील पाच वर्षांतील स्थिती : पायाभूत सुविधांअभावी कंपन्यांचा काढता पाय
Nashik 840 Companies Closed
Nashik 840 Companies Closed
Published on
Updated on

सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळे 'नाशिकमध्ये उद्योग वाढत आहेत' या चित्राबरोबरच 'विद्यमान उद्योग किती टिकत आहेत?' हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. केंद्रीय आकडेवारीनुसार २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांत महाराष्ट्रात ३६ हजार २११ खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित अथवा स्ट्राईक ऑफ झाल्या. त्यात नाशिकच्या ८४० कंपन्यांचा समावेश असून राज्यात नाशिकचा क्रमांक पाचवा आहे.

Nashik 840 Companies Closed
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

मुंबई १२ हजार ९, पुणे ६ हजार ४३३, ठाणे ४ हजार ५०४ आणि नागपूर १ हजार ४७८ कंपन्यांसह पुढे आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार, १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नाशिक विभागातील एमआयडीसी क्षेत्रात औद्योगिक व व्यावसायिक मिळून ९ हजार ८८६ युनिट्स नोंदविले गेले आहेत. या युनिट्सशी संबंधित गुंतवणूक १३ हजार ५१८ कोटी, तर रोजगार ३.४७ लाख इतका दर्शविण्यात आला असून हा आकडा वाढताच आहे.

"नाशिकमध्ये नव्या गुंतवणुकीचा ओघ सुरूच असून, कंपन्यांकडून विस्तारीकरणाला देखील प्राधान्य दिले जात आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसीकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याने, मोठे उद्योग समूह गुंतवणुकीसाठी नाशिककडे आकर्षित होत आहेत."

- दीपक पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२५

  • ९,८८६ - औद्योगिक व व्यावसायिक युनिट्स

  • १३,५१८ कोटी - गुंतवणूक

  • ३.४७ लाख - रोजगार

  • १४,८९७ - विकसित भूखंड(स्रोत : महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२५-२६)

  • २०२५ : गुंतवणुकीचे नवे संकेत

  • जिल्हा गुंतवणूक परिषद

  • १४२ - एमओयू

  • ६,४०४.९३ कोटी - प्रस्तावित गुंतवणूक

  • १४,४०३ - संभाव्य रोजगार

Nashik 840 Companies Closed
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

नाशिकच्या उद्योगांसमोरील प्रमुख आव्हाने

  • लघु व मध्यम उद्योगांवरील आर्थिक दबाव

  • कर्जाचा वाढता भार

  • कुशल मनुष्यबळाची कमतरता

  • वाढता उत्पादन खर्च

  • बाजारातील तीव्र स्पर्धा

  • तंत्रज्ञानातील वेगाने होणारे बदल

  • जमीन व पायाभूत सुविधांचा प्रश्न

  • लॉजिस्टिक आणि वाहतूक खर्च

  • विद्यमान उद्योगांच्या विस्तारासाठी आवश्यक सुविधा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news