

नाशिक : नराधम पित्याने गतीमंद मुलीस मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिक रोड येथील पळसे गावात घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिस ठाण्यात पित्याविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पळसे गाव परिसरातील पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या पित्याने बुधवारी (दि.२८) दुपारी ३.३० वाजता अत्याचार केला. पीडिता ही अल्पवयीन व गतीमंद आहे. पित्याने तीला घरात नेत मारहाण केली. तसेच तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने नाशिक रोड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार संशयिताविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, नातलगांकडूनच चिमुकलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. याआधीही शहरात पित्याने चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.