Nashik Health Worker : आरोग्यदूत बाळकृष्ण शिरसाठ यांचे आराेग्य सेवेत मोलाचे योगदान

रुग्णसेवेसाठी सातत्याने पुढे येत त्यांनी आरोग्यसेवेचा वसा जोपासला
इंदिरानगर (नाशिक)
इंदिरानगर : आरोग्यदूत बाळकृष्ण शिरसाठ यांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेला सत्कारPudhari News Network
Published on
Updated on

इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी परिसरात आरोग्यदूत म्हणून नाव बाळकृष्ण शिरसाठ यांचे नाव आग्रक्रमाने घेतले जाते. कोरोना काळापासून आजपर्यंत रुग्णसेवेसाठी सातत्याने पुढे येत त्यांनी आरोग्यसेवेचा वसा जोपासला आहे. याबरोबरच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यापासून वेगवेगळी आरोग्य शिबिरे घेऊन त्यांनी आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले आहे.

आरोग्यदूत शिरसाठ यांनी कोविड-19 मध्ये 15 ते 20 हजार घरांमध्ये स्व:खर्चाने सिनेटायझर वाटप केले होते. तसेच शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारून आठशे ते नऊशे लोकांवर उपचार करून जीवनदान दिले. करोना काळात तत्काळ दोन रुग्णवाहण्यांची व्यवस्था करून मागेल त्याला रुग्णवाहिका विनामूल्य दहा मिनिटात उपलब्ध करून देणारा पहिला उपक्रम सुरू केला. करोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी 18 ते 20 रक्तदान शिबिर घेत एक विक्रम केला.

रक्तदान शिबिरातून रक्तसंकलन मोहिमेला दिलेले पाठबळ
रक्तदान शिबिरातून रक्तसंकलन मोहिमेला दिलेले पाठबळ

कोविड रुग्णांची अनेक रुग्णालयांकडून आर्थिक लूट होत असताना शिरसाठ यांनी रुग्णालयांशी संपर्क करत सुमारे एक कोटी ८५ लाख रुपयांची बिलांची रक्कम कमी करून देत रुग्णांना दिलासा दिला. ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्रबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या आजारावरील 470 लोकांचे उपचार व शस्त्रक्रिया विनामूल्य करून दिले, पाथर्डी पंचक्रोशीत शंभर शेतकऱ्यांना एक बॅग गव्हाचे बियांची व खताची गोणी शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली. कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना रोख एक लाख रुपये भविष्य निधी देण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ एक वृक्ष स्मरण हा उपक्रम राबवत 180 वृक्षांचे रोपण करून संगोपन करत आज सदर वृक्ष आठ ते दहा फुटापर्यंत वाढीस गेले आहेत. महिलांसाठी योगा प्रशिक्षण, सेल्फ डिफेन्स करण्याकामी पंधरा दिवसांचे शिबिर घेतले. यात सुमारे दीड हजार महिलांनी सहभाग घेतला.

इंदिरानगर : कोरोना काळात घरोघरी औषण फवारणीसाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बाळकृष्ण शिरसाठ
इंदिरानगर : कोरोना काळात घरोघरी औषण फवारणीसाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बाळकृष्ण शिरसाठ

धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव परिसरात दोन भागवत कथेचे यशस्वी आयोजन तसेच शिव महापुराण पाच कथेचे विविध ठिकाणी आयोजन केले. राष्ट्रीय कीर्तन महोत्सव व हिंदू संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करून या ठिकाणी दोन नवीन रुग्णवाहिका तसेच वैकुंठ रथ तसेच 31 हजार कुटुंबांसाठी फॅमिली हेल्थ कार्ड वाटप करणार आहेत.

इंदिरानगर : परीसरासाठी वैकुंठरथाची सोय करणारे आरोग्यदूत बाळकृष्ण शिरसाठ
इंदिरानगर : परीसरासाठी वैकुंठरथाची सोय करणारे आरोग्यदूत बाळकृष्ण शिरसाठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news