Harihar Fort: हरिहर गडावर जाताय? पर्यटकांसाठीची नियमावली वाचा

Harihar Gad Nashik Latest News: वनविभागाचा इशारा : गडकिल्ले, धबधब्यांजवळ मद्यपान, हुल्लडबाजी करणारे रडारवर
हरिहर गड ट्रेकिंग
Conservation of forts in Nashik
हरिहर गड ट्रेकिंगPudhari News network
Published on
Updated on

Harihar Fort Nashik New Rules For Trekkers

नाशिक : पावसाळी सहलीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने पर्यटकांसाठी नियमावली जारी केली आहे. पर्यटकांनी मद्यपान, हुल्लडबाजी किंवा इतरांना त्रासदायक ठरणारे वर्तन करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागाने दिला आहे. तसेच, हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या गटांना सहलीच्या किमान 72 तास आधी बुकिंग करणे अनिवार्य केले आहे.

हरिहर गड ट्रेकिंग
Conservation of forts in Nashik
Nashik Municipal Corporation Jobs: १४० पदांची भरती बारगळणार, हे आहे कारण

पावसाळा सुरू होताच वर्षासहलीसाठी पर्यटक सज्ज झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात हरिहर गड, अंजनेरी गड, ब्रह्मगिरी, दुगारवाडी धबधबा, पहिने धबधबा, साल्हेर, मांगीतुंगी यांसारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र काही ठिकाणी काही पर्यटक गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास येते. अशा वर्तनामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो, तसेच प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले आणि धबधब्यांजवळ अनुचित वर्तन करणाऱ्यांवर पोलिस आणि वनविभागाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात वर्षासहलीसाठी जाणार्‍या पर्यटकांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

हरिहर गड ट्रेकिंग
Conservation of forts in Nashik
Hanuman Janmotsav 2025 : नाशिकमधील अंजनेरी आणि हनुमान जन्मोत्सव, काय आहे इतिहास?

पर्यटकांसाठी नियमावली :

  • मद्यपान व हुल्लडबाजी टाळा.

  • सहलीपूर्वी हवामानाचा अंदाज आणि वनविभागाच्या चेतावण्या पहा.

  • पोलिस, वनरक्षक किंवा स्थानिक मार्गदर्शकांच्या सोबतच ट्रेक करा.

  • सुरक्षित, माहितीपूर्ण मार्गच निवडा; धोकादायक वाटा टाळा.

  • रेनकोट आणि प्राथमिक उपचार किट ठेवा.

  • इलेक्ट्रॉनिक वस्तूंकरिता ड्रायबॅग वापरा.

  • हलके व ऊर्जा देणारे अन्न आणि पाण्याची बाटली जवळ ठेवा.

  • गटातच फिरा; परस्पर लक्ष ठेवा आणि मदत करा.

  • नद्या किंवा धबधब्याजवळ फक्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच जा.

  • स्थानिक आपत्कालीन क्रमांक व माहिती मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news