Nashik Gold Theft | दुसरा बेत फसला, सराफ पेढीतून दागिने चोरणारे परप्रांतीय जेरबंद

२ लाख ४९ हजार ४७५ रुपयांचे दागिने लंपास
Nashik Crime
सराफ पेढीतून दागिने चोरणारे परप्रांतीय जेरबंदfile
Published on
Updated on

नाशिक : नाशिकराेड येथील पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्समध्ये चाेरी केल्यावर पंधरा दिवसांनंतर पुन्हा याच सराफा पेढीच्या कँनडा काॅर्नर येथील शाखेत चोरी करण्यासाठी आलेल्या गुजरातमधील दाेघा संशयितांना उपनगर पोलिसांनी पकडले आहे. या दोघांनी १७ डिसेंबरला २ लाख ४९ हजार ४७५ रुपयांचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

चंद्रकांत विनोदभाई परमार (५५), पुनम कमलेश शर्मा (५७,दोघे रा. अहमदाबाद, गुजरात) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. उंटवाडी येथील नयन प्रकाश माळवे (४२) यांच्या फिर्यादीनुसार, १७ डिसेंबरला दुपारी दीडच्या सुमारास संशयित चोर आले होते. त्यांनी दागिने खरेदीच्या बहाण्याने सेल्समनचे लक्ष विचलीत करून चोरट्यांनी दुकानातील सुमारे तीन तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीवरून संशयितांचे फोटो काढून ते शहरातील बहुतांश सराफ व्यावसायिकांना पाठवले. दरम्यान, चोरटे पुन्हा कॅनडा कॉर्नर येथील सराफ दुकानात आल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना पकडले. या चाेरट्यांनी चाेरुलेले साेने जप्त करण्यासाठी एक पथक गुजरातला पाठवण्यात आले आहे. तसेच दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसरा बेत फसला

नाशिकराेडच्या गाडगीळ सराफात चाेरी केल्यानंतर दाेघांनी गुजरातमध्ये चोरीच्या सोन्याचे दागिने विक्री केल्याचे समजते. त्यानंतर पुन्हा बुधवारी (दि.१) दाेघे संशयित नाशिकमध्ये आले. त्यांनी गाडगीळ सराफाच्या कॅनडा काॅर्नर येथील पेढीत पाेहाेचून चाेरीसाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा शाखेतील कर्मचाऱ्यांनी दाेघा संशयितांना ओळखले. त्यांनी दोघांची माहिती उपनगर पाेलिसांना माहिती दिली. दरम्यान, दाेघांना संशय आल्याने त्यांनी दुकानातून पळ काढला. मात्र, उपनगर पाेलिसांनी संशयितांचा पाठलाग करीत त्यांना पंचवटीतील पेठराेडवरील भक्तिधाम परिसरातून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news