Nashik Urban Challenge Fund - अर्बन चॅलेंज फंडमधून नाशिकला २७२ कोटी

शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मिळणार गती
Nashik Municipal Election
Nashik MunicipalPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक महापालिकेचे दूरदृष्टीटीपूर्ण नियोजन आणि सक्षम प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फेड अंतर्गत राशिक शहरातील महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत शहराला सुमारे २७२ कोटींचे केंद्रीय अनुदान मिळणार असून, नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक प्रक्रियेत नाशिकची निवड करण्यात आली असून, ही निवड म्हणजे शहराच्या विकास आराखड्यावर केंद्र शासनाने व्यक्त केलेला विश्वास मानला जात आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी राष्ट्रीय शिखर समितीकडे सादर केलेल्या विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प, क्लीन गोदावरी अभियान, वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प, रामतीर्थ मार्ग पुनर्विकासाचा दुसरा टप्पा तसेच निर्मल नाशिक या एकात्मिक रस्ते व लॉजिस्टिक योजनेचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे शहरातील रस्ते अधिक सक्षम होणार असून, पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. गोदावरी नदीसंवर्धगाला चालना मिळणार असून वाहतूक व्यवस्थाही अधिक सुलभ होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची मानली जात आहेत.

मनपाने यापूर्वी ४०० कोटीचे म्युनिसिपल बाँड्स उभारून आर्थिक शिस्त आणि सक्षम वित्तीय नियोजनाचा आदर्श निर्माण केला होता, याच भक्कम आर्थिक तयारीमुळे अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत नाशिकला है यश मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, मंजूर प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत सुमारे १,१०० कोटी असून, त्यापैकी २५ टके म्हणजेच २७२. २२ कोटींचे केंद्रीय अनुदान प्राप्त होणार आहे .

नाशिक बनणार भविष्य सज्ज शहर !

या मंजुरीमुळे नाशिकला भविष्य सज्ज शहर अर्थात फ्युचर रेडी भेंड रेजिलियंट सिटी म्हणून विकसित करण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. जलपुरवठा, मलनिस्सारण विस्तार, नागरी गतिशीलता, पर्यावरणीय शाश्वतता आणि एकूणच राहणीमानाचा दर्जा यामाध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून, कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी नाशिक सुसज्ज होणार आहे.

अर्बन चलेंज फंड अंतर्गत मिळालेली मंजुरी ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. नियोजनबद्ध प्रसन, आर्थिक शिस्त आणि टीमवर्कमुळे हे यश मिळाले आहे. या निधीतून नाशिकला अधिक सक्षम, स्वच्छ, सुंदर आणि भविष्याभिमुख शहर बनविण्याचा आमचा संकल्प आहे

- मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका

मंजूर प्रमुख प्रकल्प - (कंसात अर्बन चॅलेंज फंडमधून मिळणारा निधी)

जलशुद्धीकरण केंद्र व संबंधित कामे ४०० कोटी (१०० कोटी)

स्वच्छ गोदावरी मोहीम २२५ कोटी (५६.२५ कोटी)

बायो-मेधनेशन व वीजनिर्मिती प्रकल्प । १० कोटी (२.५ कोटी)

रामतीर्थ मार्ग पुनर्विकास (दुसरा टप्पा): ६२.५१ कोटी (१५.६३ कोटी)

निर्मल नाशिक अंतर्गत स्मार्ट रस्ते, पार्किंग व लॉजिस्टिक सुविधा

अ. ट्रक, बस टर्मिनल १५० कोटी (३७.५० कोटी)

ब. ऑन-आऑफ स्ट्रीट पार्किंग, ऑप्टिकल फायबर नेटवर्क: २०५ कोटी (५१.२५ कोटी)

क. वेस्ट टू वंडर पार्क: ६.३० कोटी (१.५९ कोटी)

ड. यशवंत मंडई येथे बहुमजली वाहनतळ ३० कोटी (७.५० कोटी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news