नाशिक गणेशोत्सव 2024 : विसर्जनासाठी २९ नैसर्गिक स्थळं, ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

महापालिकेचे 'मिशन विघ्नहर्ता' : मूर्ती दान करण्याचे आवाहन
गणेश विसर्जन
गणेश विसर्जन pudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : मनपा कडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली जात असून, सहाही विभागांतील २९ नैसर्गिक अर्थात पारंपरिक विसर्जन स्थळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवांतर्गत शहरातील विविध भागांत ५६ ठिकाणी कृत्रिम तलावही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन टाइम स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महापालिकेच्या वतीने 'मिशन विघ्नहर्ता' संकल्पना राबविली जात आहे. याअंतर्गत जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावात मूर्ती विर्सजन करण्याचे तसेच मूर्ती दान करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे. पीओपी मूर्तींचे नदीपात्रऐवजी घरीच विसर्जन व विघटन होण्यासाठी अमोनियम कार्बोनेट पावडरचे वाटप सुरू आहे. कृत्रिम तलावांसोबतच टॅंक ऑन व्हिल्स उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत ५० किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांकरिता मागणीनुसार फिरता विसर्जन टॅंक उपलब्ध करून दिला जाणार आहे.

विसर्जनासाठी नैसर्गिक ठिकाणे अशी...

  • नाशिक पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ आगरटाकळी, नंदिनी गोदावरी संगम.

  • नाशिक पश्चिम : गोदावरी नदी यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट.

  • पंचवटी : रामकुंड परिसर, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल, म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर-मानूर गोदावरी पूल, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल, आडगाव पाझर तलाव, तपोवन कपिला संगम.

  • सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, आसाराम बापू पूल, अंबड - लिंकरोड नासर्डी पुलाजवळ, आयटीआय पुलाजवळ.

  • नाशिक रोड : दसक गाव, गोदावरी नदी स्मशान घाटालगत, दसक गावठाण मारुती मंदिरालगत, चेहेडी गाव दारणा नदी, चाडेगाव, देवळाली गाव वालदेवी नदी, विहितगाव, वडनेरगाव.

कृत्रिम तलावांची ठिकाणे...

  • नाशिक पूर्व - लक्ष्मीनारायण घाट, रामदासस्वामी मठाजवळ, रामदासस्वामी नगर लेन १ बसस्टॉप जवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक राजसारथी सोसायटी.

  • नाशिक पश्चिम - चोपडा लॉन्स पूल गोदापार्क, चव्हाण कॉलनी परिचा बाग, फॉरेस्ट नर्सरी पूल गंगापूर रोड, येवलेकर मळा बॅडमिंटन हॉल, दोंदे पूल उंटवाडी रोड म्हसोबा मंदिराजवळ नासर्डी पूल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब गार्डन नवीन पंडित कॉलनी.

  • पंचवटी - पेठ रोड आरटीओ कॉर्नर, दत्तचौक गोरक्षनगर, राजमाता मंगल कार्यालयालगत, नांदूर-मानूर पूल, कोणार्कनगर, आडगाव पाझर तलाव, म्हसरूळ सीता सरोवर, तपोवन कपिला संगम, रासबिहारी शाळेसमोर प्रमोद महाजन उद्यानाजवळ, रामवाडी चिंचबन, रोकडोबा सांडवा ते गौरीपटांगण परिसर.

  • सातपूर - गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, आसारामबापू पूल, पाइपलाइन रोड रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ, धर्माजी कॉलनी शिवाजीनगर, अशोकनगर पोलिस चौकीसमोर, अंबड लिंकरोड नासर्डी पुलाजवळ, आयटीआय पुलाजवळ.

  • नाशिक रोड - नारायण बापूनगर चौक, राजराजेश्वरी चौक, तानाजी मालुसरे क्रीडांगण चेहेडी, शासकीय तंत्रनिकेतन सामनगाव रोड, जयभवानी रोड, के. एन. केला शाळेमागे, शिखरेवाडी मैदान, गाडेकरमळा, मनपा शाळा क्रमांक १२५ मैदान.

  • नवीन नाशिक - गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ जुने सिडको, राजे संभाजी स्टेडिअम, अंबड पोलिस स्टेशन चौक, मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडे, पवननगर जलकुंभाजवळ, डे-केअर शाळेजवळ, गामणे मैदान वासननगर, अंजना लॉन्सजवळ पाथर्डी, पिंपळगाव खांब वालदेवी घाट.

दानात प्राप्त मूर्ती येथे विसर्जित करणार...

पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेअंतर्गत मूर्ती दान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नैसर्गिक विसर्जनस्थळी तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी महापालिकेतर्फे मूर्ती संकलन केंद्रे उभारली जाणार आहेत. दानात प्राप्त झालेल्या मूर्तींचे एकत्रित विसर्जन केले जाणार आहे. नाशिक पूर्व विभागातील आगरटाकळी येथील मलनिस्सारण केंद्र परिसर,

  • गंगापूर गाव येथील मलनिस्सारण केंद्र,

  • चेहेडी मलनिस्सारण केंद्र परिसर

  • नवीन नाशिक विभागातील अंबड गाव

  • पाथर्डी गाव येथील विहिरीत मूर्तींचे एकत्रित विसर्जन केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news