Nashik Fraud News | बँक व्यवस्थापकासह चौघांना सव्वा कोटीचा ‘ऑनलाइन’ गंडा

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग, आयपीओ खरेदीचा बहाणा
Nashik Fraud News
बँक व्यवस्थापकासह चौघांना सव्वा कोटीचा ‘ऑनलाइन’ गंडाfile photo
Published on
Updated on

नाशिक : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग, आयपीओ खरेदीच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एका बँक व्यवस्थापकासह इतरांना एक कोटी 32 लाख 80 हजार 879 रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा 30 ते 40 हजार रुपयांचा परतावा आणि एकरकमी गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी हा गंडा घातला. शहरातील एका बँकेत मॅनेजर असलेल्या व्यक्तीसह इतर तिघांची मार्च ते 31 जुलैदरम्यान फसवणूक झाली. सायबर पोलिसांकडे दाखल गुन्ह्यानुसार, बँक व्यवस्थापकास 45 लाख रुपये घेत त्यास पाच लाखांचा परतावा दिला, तर उर्वरित पैसे परत न करता फसवणूक केली. तर इतर तिघांकडून 93 लाख रुपये घेत फसवणूक केली आहे. संशयितांनी बँक मॅनेजरसह इतर तिघांना व्हॉट्सअ‍ॅपवरून संपर्क केला. त्यांना शेअर मार्केटमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील जाहिराती दाखविल्या. यानंतर कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करीत त्यांना गुंतवणुकीस प्रोत्साहित केले. तसेच बनावट कंपनींच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास सांगत चौघांकडून पैसे घेतले. मात्र, हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेच नाहीत. परतावा किंवा गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने चौघांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांशी संपर्क साधणार्‍यांसह ज्यांच्या बँक खात्यात, वॉलेटमध्ये पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनोळखी व्यक्तीचे व्हॉट्सअ‍ॅप व मोबाइल कॉल घेणे टाळावे. सायबर गुन्हेगारांच्या कोणत्याही धमकीला, दबावाला व आमिषाला बळी पडू नये. सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. मोबाइलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. स्वतःची माहिती शेअर करू नये.

- रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news