Nashik Fraud Crime | पार्सलमध्ये 'एमडी' सापडल्याची भीती घालून २७ लाखांचा गंडा

६४ वर्षीय व्यक्तीची फसवणूक
Nashik Fraud Crime | पार्सलमध्ये 'एमडी' सापडल्याची भीती घालून २७ लाखांचा गंडा
Published on
Updated on

नाशिक : परदेशात पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी व इतर आक्षेपार्ह साहित्य सापडल्याची भीती घालून भामट्यांनी शहरातील सेवानिवृत्त व्यक्तीस २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. भामट्यांनी ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान हा गंडा घातला.

आडगाव येथील कोणार्कनगर परिसरातील ६४ वर्षीय व्यक्तीस संशयितांनी फसवले. सेवानिवृत्त व्यक्तीच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी त्यांना मोबाइलवरून संपर्क साधला. तसेच तुम्ही परदेशात पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी व इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले आहेत, असे सांगितले. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भामट्यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदार घाबरले. त्यानंतर भामट्यांनी तक्रारदारास बँक खात्याची माहिती जाणून घेण्याच्या बहाण्याने २७ लाख रुपये स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेत संशयितांविराेधात फिर्याद दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news