Nashik Scam Arrests | भंगार खरेदी घोटाळाप्रकरणी पाच जणांना अटक

उद्योजकांना फसविणारे रॅकेट उघडकीस
Nashik | Five persons arrested in connection with scrap procurement scam
भंगार खरेदी घोटाळाप्रकरणी पाच जणांना अटकFile Photo

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीतील भंगार खरेदी घोटा‌ळ्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात कंपनीतील दोन कर्मचारी आहेत. न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच तीन वजनकाटा चालकांनाही ताब्यात घेतले आहे.

भंगार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने ट्रकच्या वजनामध्ये तसेच काटा पावतीमध्ये फेराफार करून इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक प्रशांत संघई यांची करोडो रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी अभिषेक शर्मा या स्क्रॅप विक्रेत्यावर अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पुढील तपास सुरू असताना पोलिसांनी शर्मा याला मदत करणाऱ्या कंपनीचे जितेंद्र मिश्रा (वय ४८ रा. पाथर्डी फाटा,) तसेच गोपाल राणे (वय ४२ अंबिकानगर, कामटवाडे) या दोघा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही फिर्यादी संघई यांच्या कंपनीत सुपरवायझर आहेत. स्क्रॅप विकत घेणाऱ्या शर्मा याला ट्रकच्या वजनकाट्यात फेरफार करण्यास हे दोघे मदत करत होते. त्यामुळे अंबड पोलिसांनी सोमवारी सकाळी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांची पोलिस कोठडी

सोमवारी दुपारनंतर या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार दिनांक २४ जुलैपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या चौकशीनंतर वजन काट्यांमध्ये तसेच वजन पावत्यांमध्ये फेराफार करणाऱ्या तीनही वजनकाट्यांवरील ऑपरेटर्सला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे अजूनही उद्योजकांची फसवणूक करणारे स्क्रॅप व्यावसायिक समोर येण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news