

लासलगाव (नाशिक) : लासलगावजवळील टाकळी-विंचूर येथील श्रीदत्त मंदिराचा प्रथम वर्धापन दिन बुधवार (दि.30) रोजी उत्साहात साजरा करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार भास्कर भगरे, बाळासाहेब सानप, नाशिकचे ज्येष्ठ ज्योतिषाचार्य प्रभाकर भोजने, शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, प्रकाश नन्नावरे, राजेंद्र जायभावे, शुभांगी नांदगावकर, कृष्णराज शेवलेकर, विश्वजितमुनी लासुरकर आणि अरुण भोजने यांचा समावेश आहे.
सोहळ्याच्या दिवशी श्रीदत्त देवपूजा, श्रीमूर्ती पूजन आणि विडाअवसर यासारखे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानंतर महानुभाव पंथाचे भजनसम्राट विशाल जोगदेव यांच्या "चक्रधर भक्तीधारा" या भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच गुरुवार, 1मे रोजी ध्वजारोहण, धर्मसभा, पंचवतार उपहार, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.