नाशिक : दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांची मागणी: दुधाला अनुदान नको, दरवाढ हवी
milk price hike
नाशिक : दूध दरवाढ करावी या मागणीसाठी आंदोलन करताना कोंडाजी आव्हाड, किरण सानप, भगवान नागरे, रवि चकाेर व दूध उत्पादक शेतकरी. (छाया : हेमंत घाेरपडे)
Published on
Updated on

नाशिक : दुधााला अनुदान नव्हे, तर दरवाढ करावी या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. २९) आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.

राज्य शासनाने शुक्रवारी (दि. २८) सादर केलेल्या अर्थसंकल्पात दुधासाठी पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. शासनाच्या घोषणेविरोधात दूध उत्पादकांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सोबत गायीदेखील आणल्या होत्या. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने जाहीर केलेला दुधाचा ३४ रुपये दर हा कागदावर आहे. प्रत्यक्षात अन्य राज्यांच्या तुलनेत २२ ते २७ रुपये इतकाच हा दर आहे. यात मोठे दुर्दैव म्हणजे देशात दोन लाख टनांहून अधिक दूध पावडरचा साठा असताना शासनाने १० हजार टन आयातीला परवानगी दिली. तसेच आयातीवरील शुल्कही माफ केल्याने दुधााच्या दरात आणखी घट होईल, अशी भीती आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा. दुधाला ४० रुपये दर देण्यात यावा. अनुदान नको, तर निश्चित दर करावे. भेसळीच्या दुधाावर कारवाई करावी. निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, किरण सानप, भगवान नागरे, रवि चकोर, वालिबा दराडे, सागर सावंत, शिवाजी मानकर, सूचरक करवंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news