Nashik Water Supply Issue | नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाणीबाणी; गंगापूर जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

Nashik Water Supply Issue | गंगापूर धरण थेट जलवाहिनीच्या दुरुस्तीकामाचा परिणाम
Nashik Water Supply
Nashik Water Supply pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाणीपुरवठाविषयक विविध कामांसह द्वारका येथील अंडरपासच्या कामासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मंगळवारी (दि. १८) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

Nashik Water Supply
Pune Nashik Highway Traffic: नाशिक फाटा-खेड उन्नत महामार्गाला अखेर गती; ६०० कोटींच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा

द्वारका अंडरपास परिसरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मुकणे धरणातून सुमारे १५० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मात्र, गंगापूर धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील काम अद्याप सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम बुधवारीही (दि. १९) शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण काही प्रमाणात कमी करण्यासाठी महापालिकेने चेहेडी पंपिंग स्टेशन येथून पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे.

Nashik Water Supply
Kapaleshwar Temple Nashik | श्रावणी सोमवार अन् नागपंचमीचा दुग्धशर्करा योग! नाशिक शहरातील शिवमंदिरांमध्ये 'बम बम भोले'चा जयघोष

या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने नाशिकरोड परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे नाशिकरोड भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, मुकणे धरणातून पाणी उचलण्यास सुरुवात झाल्यामुळे पूर्व विभाग, सिडकोच्या काही भागांसह पूर्वेकडील परिसरातील काही भागांना उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा करता येणार आहे.

त्यामुळे या भागातील पाणीटंचाईचा परिणाम काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, गंगापूर धरणातून पाणी उचलण्याची प्रक्रिया अद्याप बंद असल्यामुळे पश्चिम विभाग, सातपूर तसेच सिडकोच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांना बुधवारीही कमी दाबाने किंवा विलंबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news