Nashik to Italy Export | इटलीच्या वाइन पेढ्यात नाशिकच्या यंत्रांची निर्यात; 'मेक इन इंडिया'चा मोठा टप्पा

Nashik to Italy Export | वाइन उद्योगाचे माहेरघर असलेल्या इटलीत अत्याधुनिक उपकरणांची निर्यात
wine
wine
Published on: 
Updated on: 

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

वाइन उद्योगाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इटलीने आता वाइननिर्मितीसाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांसाठी नाशिककडे मोर्चा वळवला आहे. नाशिकमधील 'एनव्हिजन इचिपमेंट्स' या कंपनीने इटलीतील फ्लॉरेंस शहरासाठी दोन अत्याधुनिक 'अरोमा मल्टिपलायर टॅक'ची निर्यात केली आहे.

wine
Nashik Pneumonia Campaign | बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विशेष अभियानाला सुरुवात

विशेष म्हणजे, वाइन उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करण्यात जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या इटलीने भारतातून अशा विशेष उपकरणांची आयात करण्याची ही पहिली घटना ठरली आहे. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नाशिकमधील एनव्हिजन इचिपमेंट्स या कंपनीने चालू महिन्याच्या सुरुवातीला ही निर्यात केली. कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या दोन अरोमा मल्टिपलायर टँकपैकी एका टँकची क्षमता दोन हजार लिटर, तर दुसऱ्या टँकची क्षमता एक हजार २०० लिटर आहे.

अशा प्रकारे एकूण तीन हजार २०० लिटर क्षमतेची ही यंत्रसामग्री इटलीच्या फ्लॉरेंस शहरात पाठवण्यात आली आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा) येथून ही अवाढव्य यंत्रसामग्री इटलीकडे रवाना करण्यात आली आहे. या निर्यातीचे व्यावसायिक मूल्य सुमारे २१ हजार डॉलर (अंदाजे १८ लाख रुपये) आहे.

पहिली खेप मर्यादित असली, तरी इटलीतील खरेदीदाराशी आगामी दहा यंत्रांच्या निर्यातीबाबत चर्चा सुरू आहे. इटलीला वाइन उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निर्मितीमध्ये हे जागतिक केंद्र मानले जाते. अशा देशाने भारतातील, विशेषतः नाशिकमधील कंपनीकडून विशेष उपकरणांची आयात करणे ही भारतीय वाइन उपकरणनिर्मिती क्षेत्रासाठी ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे.

wine
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

'मेक इन इंडिया'चा ठसा

  • एनव्हिजन इचिपमेंट्स कंपनीने विकसित केलेले अरोमा मल्टिपलायर टँक इटलीला निर्यात केल्याने, भारतीय उत्पादन क्षेत्रातील तांत्रिक क्षमता आणि 'मेक इन इंडिया' संकल्पनेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी ओळख मिळत आहे.

  • वाइन उद्योगासाठी आवश्यक असलेल्या विशेष उपकरणांची निर्मिती भारतात होऊ शकते आणि ती जागतिक बाजारपेठेतील प्रस्थापित उत्पादक देशांपर्यंत पोहोचू शकतात, हा विश्वास या निर्यातीमुळे अधिक दृढ झाला आहे.

"मी मूळचा मुंबईचा असून, नाशिकला आल्टरनंतर २००३ मध्ये ३५ कामगारांना सोबत घेऊन विल्होली येथे कारखाना सुरू केला. या कारखान्यात निर्मित दोन यंत्रांची इटलीला निर्यात झाली आहे. इटलीतील खरेदीदाराशी आणखी दहा यंत्रांच्या निर्यातीबाबत चर्चा सुरू आहे."

- संजय झा, सीईओ, एनव्हिजन इचिपमेंट्स कंपनी

"वाइन क्षेत्रामध्ये इटली हा अत्यंत प्रगत देश मानला जातो. अशा देशात आपल्याकडची यंत्रसामग्री निर्यात होणे ही वाइन उद्यோगाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. आतापर्यंत आपण वाइन निर्मितीसाठी लागणारे यिस्टम केमिकल्स, ओक बॅरल्स, मशीनरी, बॉटल्स आणि पॅकेजिंग मटेरियल परदेशातून विशेषतः इटलीतून आयात करत होतो. आता आपण त्यांना मशीनरी एक्सपोर्ट करायला सुरुवात केली आहे."

- जगदीश होळकर, अध्यक्ष, ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.