

नाशिक, निखिल रोकडे
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी गेल्या सात महिन्यात नाशिक विभागात ५ कोटी १४ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे. विविध कारवाईत देशी दारू, इंग्रजी दारू, बिअर, ताडी तसेच दारू निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा समावेश आहे. या अवैध दारूविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले.
राज्यातील उत्पादन शुल्क विभाग हा शासनाच्या महसुलाचा एक प्रमुख स्रोत आहे. मद्यविक्रीतून दरवर्षी जवळपास २६ हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त होतो. तथापि, अवैध मद्य विक्री, बनावट दारू निर्मिती आणि परराज्यातून महाराष्ट्रात तस्करीने आणल्या जाणाऱ्या प्रतिबंधित मद्यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसतो. शासनाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतूक याविरोधात सातत्यपूर्ण कारवाया सुरू ठेवल्या आहेत. विशेषतः दिव दमन आणि सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या अवैध मद्याच्या वाहतुकीविरोधात स्वतंत्र मोहीम राबवण्यात येत आहे.
गेल्या सात महिन्यांतील आकडेवारी
नोंदवलेले गुन्हे - १९३८
वारस गुन्हे - १७६१
बेवारस गुन्हे - १७७
जप्त मालाची किंमत - ५,१४,९५,१२६
जप्त वाहने - ३८
जप्त मद्यसाठा - ३.५ लाख लिटर
जिल्ह्यातील अधिकृत मद्यविक्री केंद्रे
परमिट रूम - ७२५
वाईन शॉप - ८५
बिअर शॉपी - २००
वाइनरी - ४८
अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक हा गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाशी टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉट्सॲप : 8422001133 व 0253-2319744 या क्रमांकावर संपर्क करावा.
संतोष झगडे, अधीक्षक राज्य उत्पादन