Election of Co-operative Societies
सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रियेला सुरुवातfile photo

नाशिक : जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका २१ जुलैला

पावसाचा अंदाज घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका ठरल्या

नाशिक : राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या बाबतीत निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला स्थगिती दिली असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ही निवडणूक प्रक्रीया सुरु केली आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडून राज्यातील पावसाचा अंदाज आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून माहीती घेतली आहे. जिल्ह्यातील १७ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली असून, २१ जुलै रोजी त्यांचे मतदान होणार आहे.

Summary
  • सहकार विभागाने सहकारी निवडणुक प्राधिकरणाने राज्यातील आठ हजार ३०५ सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरू केली होती.

  • शेतकऱ्यांना यात सहभागी होता येणार नसल्याने पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

  • सहकार विभागाने पुन्हा शुद्धीपत्रक काढत सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे.

सहकारी निवडणुक प्राधिकरणाने राज्यातील आठ हजार ३०५ सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, पावसामुळे शेतकऱ्यांना यात सहभागी होता येणार नसल्याने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात दिनकर गावंडे यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर ज्या टप्प्यावर निवडणुका सुरू झालेल्या आहेत. त्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे सहकार विभागाने पुन्हा शुद्धीपत्रक काढत ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संस्थांच्या निवडणुका ठरल्या वेळेत घ्याव्यात, असे आदेश काढले.

Election of Co-operative Societies
Lok Sabha Speaker Election 2024 : ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

यांच्या आहेत निवडणूका

रोझे विविध कार्यकारी सेवा सोसायटी (ता. मालेगाव), पुंजाराम मोतीराम हिरे सोसायटी (ता. मालेगाव), खामगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी (ता. येवला), भाग्यलक्ष्मी सोसायटी, मुखेड (ता. येवला), लोखंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी (ता. दिंडोरी), रिंग गिअर्स एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी (ता. सिन्नर ), दादाजी झिपरू जाधव विकास सोसायटी, भादवण (ता. कळवण), नाशिक जिल्हा पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी (नाशिक), २५ ई. डी. एअरफोर्स सेवकांची सहकारी पतसंस्था (देवळाली), रिषभ इन्स्ट्रमेंटस सेवकांची सह. पतसंस्था, सातपूर (नाशिक), महाराष्ट्र समाज सेवा संघ सहकारी सेवकांची पतसंस्था (नाशिक), नाशिक शासकीय अभियंता पगारदार सहकारी पतसंस्था (नाशिक), राष्ट्रीय वीज कामगार सहकारी पतसंस्था (नाशिक), दि नाशिक पोस्टल को-ऑप क्रेडिट सोसायटी (अंबड), डेल्टा मॅग्नेटस कर्मचारी सोसायटी, अंबड (नाशिक), समृद्धी सहकारी बँक (नांदगाव), वनविकास कर्मचारी सहकारी पतसंस्था (नाशिक).

logo
Pudhari News
pudhari.news