

नाशिक : नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. एकाच दिवसात दोनदा धक्के बसले असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता २.४ आणि ३.३ अशी नोंद झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर हे धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून पेठ, हरसूल, सुरगाणा भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जमिनीखाली सातत्याने होणाऱ्या हालचालींमुळे हे धक्के जाणवत असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञांचे मत आहे. पेठ, हरसुल, सुरगाणा हे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुके आहेत. भूकंपामुळे या परिसरात कोणतीही हानी झाली नसल्याचे माहिती आहे.