Dwarka Circle Nashik | द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी सुटणार

Dwarka Circle Nashik | अखेर काठे गल्ली-सारडा सर्कल भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात
Dwarka Circle Nashik
Dwarka Circle Nashik
Published on
Updated on

नाशिक : निखिल रोकडे

शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या द्वारका सर्कल येथील समस्या आता कायमस्वरूपी सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. काठे गल्ली ते सारडा सर्कलदरम्यान प्रस्तावित असलेल्या सुमारे ३०० मीटर लांबीच्या भुयारी वाहन मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली असून, वर्षभरात द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Dwarka Circle Nashik
Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळा साधुग्राम वाद पेटला; 1000 एकर जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

नाशिकरोडकडे जाताना द्वारका सर्कल ते काठे गल्ली सिग्रलदरम्यान अर्ध्या रस्त्यात खोदकाम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत तीन महिन्यांपूर्वी या मार्गाची पाहणी करण्यात आली होती.

सध्या सुरू असलेली वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलेला नाही. नाशिक पुणे महामार्गावरील द्वारका ते नाशिकरोड हा मार्ग शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, गेल्या काही वर्षात या मार्गावर वाहतूक कॉडी ही नित्याचीच बाब झाली आहे.

या मार्गावरून पुणे, मुंबई, बंगळूरू, शिर्डी तसेच पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहने ये -जा करतात. याच मार्गावर शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये आणि व्यापारी संकुले असल्याने दिवसभर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे गेल्या काही काळात अपघातांचे प्रमाणही वाढले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात विकासकाम सुरू आहे. सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, वाहतूक व्यवस्थेचे प्रकल्प राबविले जात आहेत.

प्रयागराज कुंभमेळ्याला झालेल्या प्रचंड गर्दीच्या अनुभवातून नाशिकमध्येही भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वर्षभर येणाऱ्या भाविकांसाठी सक्षम वाहतूक व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर आहे.

द्वारका सर्कल भुयारी मार्ग हा त्याच प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम काही काळ रखडले होते. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (दि. ३१) रात्री सुमारे ११ च्या सुमारास प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

Dwarka Circle Nashik
Malegaon Municipal Corporation | 'इस्लाम' ची बाजी; रणनीती यशस्वी

पहिल्या टप्प्यात द्वारका सर्कल परिसरातील उड्डाणपुलाच्या पोल क्रमांक १०३ व १०४ दरम्यानचा भाग तसेच पुणे रोडवरील द्वारका सिग्नलपासून सुमारे १०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शनिवारी रात्रीपासून या भागात बॅरिकेडिंग करून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, त्याचे नियोजन आणि नकाशा शहर वाहतूक विभागाने जाहीर केला आहे. दुचाकी, चारचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी मात्र पुढील १० ते १२ दिवस मार्ग खुला राहणार आहे. काम सुरळीत पुढे गेल्यानंतर पुढील टप्प्यात अधिक खोदकाम सुरू होणार असून, त्यावेळी द्वारका भागातून सर्व वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news