Nashik Dry Day| मतदान, मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात ड्राय डे

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Voting
Voting Pudhari
Published on
Updated on

Nashik Dry Day Announced on Voting and Vote Counting Days

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक-२०२६ कार्यक्रमानुसार नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी गुरुवारी (दि.१८) सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून सोमवारी (दि.२२) मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या ४८ तासांपूर्वीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी संबंधित क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा, ११९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी प्रसाद यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.

Voting
Nashik Road Digging Ban | रस्ते खोदकामास 15 ऑक्टोबरपर्यंत बंदी

संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घेऊन त्याचे काटेकोर पालन करावे. आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आदेशित केले आहे.

असे आहेत आदेश

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या खालील कालावधीत बंद राहतील.

१६ जून : मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर, सायंकाळी ४ वाजल्यापासून.

१७ जून : मतदानाच्या पूर्वीचा दिवस, संपूर्ण दिवस.

१८ जून : मतदानाचा दिवस, मतदान प्रक्रिया संपेपर्यंत.

२२ जून : मतमोजणीचा दिवस, मतमोजणी

Voting
Youth Business Subsidy- मागासवर्गीय युवकांना व्यवसायासाठी आर्थिक बळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news