Nashik Drunken Girls Riot : दारू पिऊन दगडफेक करणाऱ्या तरुणींवर गुन्हा दाखल

सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
nashik
मद्याच्या नशेमध्ये विद्यार्थीनीच्या घरावर हल्ला करणाऱ्या तरुणींविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : सातपूर परिसरातील अशोक नगर येथे मद्याच्या नशेमध्ये विद्यार्थीनीच्या घरावर हल्ला करणाऱ्या तरुणींविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे.

दिशू राजपुत उर्फ नियती पाटील, रूची पाटील, दीक्षा गांगुर्डे, सानिका गायकवाड अशी संशयित तरूणांची नावे आहे. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अशोकनगर बस स्थानकाजवळ मद्यधुद तरुणींनी एका विद्यार्थिनीच्या घराबाहेर शिविगाळ करत दगडफेक केली होती. या घटनेमधील विद्यार्थिनीची एका तरुणाशी मैत्री होती. कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी एकमेकांशी संपर्क तोडला. मात्र, हा तरुण वेळोवेळी या विद्यार्थिनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याला नकार देत असल्याने हा वाद दुसऱ्या महाविद्यालयातील एका तरुणाच्या कानावर गेला. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाल्याने संबंधित तरूणाला कारागृहात जावे लागले. त्यामुळे या तरुणाशी ओळख असलेल्या संशयित मुलींनी संतापातून विद्यार्थिनीच्या थेट घरावर धडक देत दगडफेक केली होती. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news