

त्र्यंबकेश्वर ( नाशिक ) : तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी शंकर बाबुराव कसबे (६०) हे गुरुवारी (दि. १८) सकाळी १० च्या सुमारास शेतीला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांनी बेझे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेल्या वीजपंपाची वायर पसरवत असताना त्यांचा पाय घसरला. ते खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.