

नाशिक : आगर टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्ञानसंपन्नतेच्या शक्तीमुळे व्यक्ती, समाज, राज्य आणि राष्ट्र महान बनत असते. अशी आदर्श विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती, असे मनोगत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले.
भारताच्या पावन भूमीवर देशासाठी तसेच समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासणाऱ्या थोर महापुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. ही बाब आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची आहे, असे मनोगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी व्यक्त केले.
उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, नाशिक एज्युकेशन क्रेडीट सोसायटीचे सेक्रेटरी साहेबराव सवारी पवार, पापा सैय्यद, दिलीप प्रधान मचिंद्र सोनवणे यांनी देखील डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी नगरसेविका सुमन ओहोळ, किमया बागुल, म.न.पा नाशिक पूर्वचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, उपनगर गांधीनगर जयंती अध्यक्ष मनिष वडनेरे, समाजसेवक प्रवीण नवले, शिवम पाटील, अनिल गांगुर्डे, आगर टाकळी जयंती पदाधिकारी शुभम साळवे, सन्नी साळवे, विक्रांत गांगुर्डे, अनिल जोंधळे, यशवंत साळवे, मुकुंद बागुल, मिलींद पाटील, दर्शन पाचोरकर, निलेश सहाणे, पवन धांड, जितेंद्र उगावकर, सुधाकर पिल्ले, बाबा पवार, सचिन पगारे, मयुर केदारे, विल्यम कॉक्स, राहुल देवरे, संजय लोखंडे, सागर रिपोटे, जयंत म्हैसधुणे, चेतन जाधव, पिंटू केदारे, वामन पगारे, संदिप अहिरे, यतिन दिवेकर, सिद्धार्थ भालेराव, रतन पगारे, पवन जाधव, प्रकाश राऊत, सागर शिंदे, अजय जाधव, फहिम शेख, प्रवीण दारूणकर, चेतन इंगळे, प्रशांत शिरोडकर, राहुल देवरे, जय सोनवणे, गौरव केदारे, तुषार सोनकांबळे, मनिष डांगे, प्रविण पाटील, शुभाष आहिरे, निखिल साळवे, प्रकाश केदारे, रमेश पवार, हिरामण शिंदे,राजू धनगर, निखिल लोखंडे, आकाश दाणी, शिवा रामराजे, सम्राट दोंदे, कैलास पगारे, नंदू जाधव, अजय दिवे, प्रतीक कटारे, अक्षय कटारे, रवी दिवे, प्रकाश भालेराव, कारभारी वाहुळ, अभिजीत कोल्हे, नाना जाधव, अमोल फुलसुंदर, दिलीप अहिरे, कार्तिक विशपूते, पवन बागुल, यश भालेराव, जयेश पवार, कांतीलाल केदारे, माँटी बिऱ्हाडे, स्वाती बागुल, प्रमिला भालेराव, निर्मला जाधव, मीनाक्षी तेजाळे, अलका निकाळे, जया माळी, प्रभावती शेजवळ, कविता पगारे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक एज्युकेशन क्रेडीट सोसायटीचे सेक्रेटरी साहेबराव सवारी पवार यांनी सूत्रसंचालन केले.