नाशिक : सण, उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईंनी शहरातील दुकाने सजली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने देखील खवा, मावा व मिठाईच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली असून, मिठाईत भेसळ कराल तर याद रखा असा इशाराच उत्पादकांना दिला आहे.
अन्न प्रशासनाची पथके शहरातील मिठाई विक्रेते, खवा मावा विक्रेते, मिठाई उत्पादकांवर लक्ष ठेवून असून, अचानक तपासणी करीत आहेत. शिवाय अन्न व्यावसायिक व मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली असून, त्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटीचे उल्लंघन होता कामा नये, अन्न विषबाधासारखा अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी काय करावे, आदींबाबत मिठाई उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांनी दिला आहे.
- मिठाई, दुध व दुग्धजन्य व इतर अन्नपदार्थ खरेदी करताना फक्त नोंदणी/परवानाधारक आस्थापनांकडूनच खरेदी करावे, त्याचे खरेदी बिल घेऊन जतन करावे.
- मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे
- खरेदी करताना वापर योग्य दिनांक पाहून खरेदी करावे.
- उघड्यावरील अन्नपदार्थांची खरेदी करू नये.
- माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे, तसेच साठवणूक योग्य तापमानाला करावी.
- मिठाईवर बुरशी आढळल्यास तसेच चव/ वासामध्ये फरक जाणवल्यास ती मिठाई सेवन करू नये.
---
नाशिक : अन्न व्यावसायिक व मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देताना अन्न प्रशासन अधिकारी.
---
फोटो सीटी १ ला मिठाई नावाने सेव्ह