Fertilizer Online Booking | खतासाठी आता शेतकऱ्यांची धावपळ थांबणार!

Fertilizer Online Booking | मोबाईलवरून आगाऊ नोंदणी; क्यूआर कोड / टोकननुसार ठरलेल्या वेळेत मिळणार खत
Fertilizer Booking App
Fertilizer Booking AppPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना विक्रेत्यांच्या दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा, गर्दी आणि प्रतीक्षा कमी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' (एफएफएस) ही मोबाईल ॲप आधारित प्रणाली गुरुवार (दि. २७) पासून सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून आवश्यक खताची आगाऊ मागणी नोंदविता येणार असून, उपलब्ध विक्रेत्याची निवड करून मिळालेल्या क्यूआर कोड अथवा टोकननुसार ठरलेल्या वेळेत खताची खरेदी करता येणार आहे.

Fertilizer Booking App
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

खतविक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, उपलब्ध खताचे योग्य नियोजन करणे आणि शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी सहजपणे खत उपलब्ध करून देणे, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः खरीप हंगामात खतासाठी होणारी गर्दी आणि त्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी धावपळ कमी होण्यास या प्रणालीमुळे मदत होणार आहे.

'एफएफएस' प्रणालीचा वापर करताना सर्वप्रथम शेतकऱ्याची ओळख (फार्मर आयडी) अथवा उपलब्ध ई-केवायसी आधाराच्या माध्यमातून पडताळली जाईल. त्यानंतर शेतकऱ्याने स्वत:च्या जमिनीची तसेच सध्या घेतलेल्या पिकाची माहिती नोंदवायची आहे.

पुढील टप्प्यात आवश्यक असलेले खत आणि त्याचप्रमाणे निवडून मागणी नोंदविता येईल. यानंतर उपलब्ध असलेल्या सहकारी संस्था किंवा अधिकृत खासगी खतविक्रेत्याची निवड करता येणार आहे. बुकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईलवर क्यूआर कोड अथवा टोकन प्राप्त होईल. त्यानुसार निश्चित केलेल्या वेळेत संबंधित विक्रेत्याकडून खत घेता येणार आहे.

विक्रेत्यांचीही पूर्वतयारी (चौकट)

'एफएफएस' प्रणाली सुरळीतपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील ३२९ घाऊक आणि १,५०४ किरकोळ खतविक्रेत्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रणालीच्या वापराबाबत आवश्यक पूर्वतयारीही करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार उपलब्ध साठ्याचे नियोजन आणि विक्रीची नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवणे शक्य होणार आहे. विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांना 'एफएफएस' प्रणालीचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Fertilizer Booking App
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

जमीन नोंदीतील अडचणींचीही दखल (चौकट)

खताची मागणी नोंदविताना जमिनीची मालकी, वारसाहक्क, भाडेकरार, फेरफार अथवा जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या व्यक्तीच्या नोंदीबाबत अडचण निर्माण झाल्यास संबंधित महसूल विभागाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती तपासून आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे नोंदीतील त्रुटींमुळे पात्र शेतकऱ्यांना खत मिळण्यात अडथळा येऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली असून, 'एफएफएस' प्रणालीमुळे खताची मागणी, विक्रेत्याची निवड आणि खताची विक्री यांची ऑनलाइन नोंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news