Nashik district health officer suspension| जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे निलंबित

नाशिक- कामकाजाबाबत तक्रारींवर आरोग्य मंत्र्यांकडून कारवाईचा बडगा
डॉ. सुधाकर मोरे
डॉ. सुधाकर मोरे
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना शासनाने निलंबित केले आहे. डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत निलंबनाची कारवाई केली आहे.

डॉ. मोरे यांच्याबाबत जिल्ह्यातील मंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधींही तक्रारी केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना त्रास देणे, कामात दुर्लक्ष याबाबत अक्षेप घेण्यात आले होते. तीन वर्षांतील डॉ. मोरे यांच्या सर्व तक्रारींची दखल घेत आरोग्य विभागाने ही कार्यवाही केली आहे. निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. डॉ. मोरे यांच्या कामाबाबत तसेच कर्मचाऱ्यांचा छळ, कामावर हजर नसणे, आरोग्य केंद्रांना भेटी न देणे, बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार आदींबाबत अनेकदा तक्रारी झाल्या होत्या.

तसेच त्यांची चौकशीदेखील झाली होती. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडेही त्यांच्या तक्रारी होऊन त्यांची चौकशी झाली होती. समुदाय अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणातही चुकीच्या कामकाजाचा त्यांच्यावर ठपका होता. यातच गत महिन्यात प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री आबिटकर यांच्याकडे डॉ. मोरे यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, वाढत्या तक्रारींवर डॉ. मोरे यांना आरोग्य विभागाने १५ दिवसांपूर्वी नोटीस बजाविली होती. त्यावर डॉ. मोरे यांनी खुलासादेखील केला. मात्र, हा खुलासा समाधानकारक नसल्याकारणाने त्यांचे निलंबन करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत.

डॉ. सुधाकर मोरे
Nashik|'आदिवासी जेन झी' मुंबईत धडकणार, तेरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे; धरणे आंदोलन कायम

डॉ. जयेंद्र थविल यांचेही निलंबन

सुरगाणा तालुक्यातील पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेंद्र थविल यांचे देखील शासनाने निलंबन केले आहे. त्यांच्या कामकाजाबाबत जुन्या तक्रारी होत्या. त्यावर त्यांची चौकशी सुरू होती. मुख्यालयी थांबत नाही, रुग्णतपासणी करत नाही आदी त्यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून झाल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.

डॉ. सुधाकर मोरे
Nashik Sinhastha Kumbh Mela | सिंहस्थ कामांना एप्रिल 2027 ची 'डेडलाइन'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news