नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीतून गोरगरिबांना कमी खर्चात व जलद न्यायदान व्हावे, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी व्यक्त केली. तसेच नूतन इमारतीमुळे नाशिकला वेगळी ओळख प्राप्त होणार असल्याचेही मत व्यक्त केले. देशातील न्यायालयाच्या आकर्षक इमारतींपैकी नाशिकची इमारत आहे. देशाचे सरन्यायाधीश गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या संविधान मूल्यांची अंमलबजावणी करणारे आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाननिर्मिती करताना, लोकांचे राज्य लोकशाही पद्धतीने चालविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र संविधानामध्ये समाविष्ट झाले पाहिजे, यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी तत्कालीन सरकारला ते समाविष्ट करावे लागले. त्याच प्रकारचा सकारात्मक विचार व संविधान चौकट जपणारे सरन्यायाधीश आपल्याला लाभले आहेत, ही महाराष्ट्रासाठी भूषणावाह बाब आहे. आज संपूर्ण देशात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे मराठी माणसाची ओळख म्हणून पाहिले जात आहे.
अॅड. जयंत जायभावे, सदस्य, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला इतिहास आहे. अनेक उत्तमोत्तम वकील आणि न्यायाधीश येथून तयार झाले आहेत. ही एक इमारत राहणार नाही, तर नाशिकची वेगळी ओळख निर्माण करेल.
चंद्रशेखर, मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
महाराष्ट्रात अशी पहिलीच इमारत आहे, ज्यात सरकते जिने आहेत. त्याचा लाभ पक्षकार, वकील आणि न्यायाधीशांनाही घेता येणार आहे. कर्मचार्यांसाठीही इमारतीत सोयी सुविधा आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही अशा इमारती उभारण्यास मदत व्हायला हवी.
सारंग कोतवाल, पालक न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
नूतन इमारतीचा ‘स्टेट ऑफ आर्ट’ म्हणून उल्लेख करता येईल. या इमारतीमुळे जलद गतीने न्यायदान प्रक्रिया राबवता येईल. नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या न्यायालयाची इमारत मेरी येथे व्हावी असे शासनाने सुचवले होते. मात्र वकील बांधवांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चेंबर खरेदी केलेले असल्याने त्यांची गैरसोय झाली असती. याच ठिकाणी इमारत उभारली गेल्यामुळे सोयीस्कर झाले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज हे नाशिकरोड इथून चालते. आता मुख्य इमारतीमध्ये जागा आहे. इतरही न्यायालयांच्या पूर्वीच्या इमारती रिकाम्या होतील. तेथे कौटुंबिक न्यायालय स्थलांतरित व्हावे. महसूलदृष्ट्या जिल्ह्याचा सर्किट बेंचसाठी दावा योग्य असून, त्याचाही विचार व्हावा. वकील भवन अकॅडमी यासाठी त्र्यंबक रोड येथे जागा बघितलेली आहे. त्या प्रस्तावाला गती मिळावी.
अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक वकील संघ
देशातील न्यायालयाच्या आकर्षक इमारतींपैकी नाशिकची इमारत आहे. देशाचे सरन्यायाधीश गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या संविधान मूल्यांची अंमलबजावणी करणारे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाननिर्मिती करताना, लोकांचे राज्य लोकशाही पद्धतीने चालविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र संविधानामध्ये समाविष्ट झाले पाहिजे, यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी तत्कालीन सरकारला ते समाविष्ट करावे लागले. त्याच प्रकारचा सकारात्मक विचार व संविधान चौकट जपणारे सरन्यायाधीश आपल्याला लाभले आहेत, ही महाराष्ट्रासाठी भूषणावाह बाब आहे. आज संपूर्ण देशात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे मराठी माणसाची ओळख म्हणून पाहिले जात आहे.
अॅड. जयंत जायभावे, सदस्य, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल
नाशिकला आता उत्तम इमारत मिळाली आहे. या इमारतीतून सर्वांना जलद न्याय मिळावा, ही अपेक्षा आहे. त्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी जबाबदारी स्वीकारावी. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे.
रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
सरन्यायाधीश गवई यांच्या मदतीने उत्तम अशी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचा फायदा तरुण वकिलांनी घ्यावा. गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा. ही इमारत नाशिककरांसाठी वेगळी ओळख निर्माण करेल.
मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय
नाशिक : संविधानिक कायद्यातील नवीन संकल्पना, सुधारणा यावर प्रकाशझोत टाकणारे ‘गार्डिंग द रिपब्लिक’ या प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. इनामदार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालयात प्राचार्यापदावर कार्यरत असून, आतापर्यंत त्यांचे कायदा या विषयातील 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर 11 व्या पुस्तकाचे प्रकाशन सरन्यायाधीश यांच्या हस्ते झाले. पुस्तक प्रकाशन प्रसंगी न्यायमूर्ती रेवती डेरे-मोहिते, एम. एन. सोनम, आर. व्ही. घुगे, ए. एस. गडकरी, मकरंद कर्णिक, सारंग कोतवाल, जितेंद्र जैन, अश्विन भोबे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, प्रमुख न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, अध्यक्ष अमोल सावंत, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड. जयंत जायभावे आदी उपस्थित होते.