Nashik District Court : सरन्यायाधीश भूषण गवई 27 रोजी नाशिकमध्ये

जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे येत्या शनिवारी लोकार्पण
नाशिक
सरन्यायाधीश भूषण गवई Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन येत्या २७ सप्टेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र व गोवा वकील परिषद सदस्य ॲड. जयंत जायभावे, संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे, सहसचिव ॲड. संजय गिते, ॲड. सोनाल गायकर, खजिनदार ॲड. कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा न्यायालयाची स्थापना सन १८८५ मध्ये झाली. जुन्या दगडी इमारतीनंतर सन २००५ मध्ये न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्यात आली होती. मात्र खटले, वकील व न्यायाधीशांची संख्या वाढल्याने न्यायालयाच्या विस्ताराची आवश्यकता भासली. वकील संघाच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयासाठी अडीच एकर जागा उपलब्ध झाली. सन २०२० मध्ये राज्यस्तरीय वकील परिषदेच्या वेळी या जागेवरील पाच लाख चौ. फुटांच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले होते. न्यायमूर्ती गवई व अभय ओक यांच्या पाठिंब्यामुळे केवळ चार वर्षांत हे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.

नाशिक
Nashik Court: वाहतूक पोलिसाला धडक, 13 वर्ष चालला खटला; शिक्षा काय झाली हे वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सुमारे ३१० कोटी रुपये खर्चून बांधलेली अत्याधुनिक सुविधा असलेली ही इमारत लोकार्पणासाठी सज्ज झाली आहे. हा सोहळा जिल्हा न्यायालयालगतच्या पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. नाशिककरांनी याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

नूतन इमारतीची वैशिष्ट्ये दृष्टीक्षेपात

  • जिल्हा न्यायालयाची देशातील पहिली सात मजली इमारत

  • तब्बल ४५ न्यायदान कक्ष

  • ७०० लोकांची आसनक्षमता असणारे सभागृह,

  • स्वतंत्र पार्किंग इमारत, ५०० चारचाकी आणि १००० दुचाकी वाहन क्षमता

  • स्वतंत्र हिरकणी कक्ष

  • वैद्यकीय पोस्ट ऑफिस रेकॉर्ड रूम, उपहारगृह

  • न्यायालयाच्या इमारतीत प्रथम स्वयंचलित सरकता जिना

  • चार हजार वकील व हजारो नागरिकांना सुविधा का लाभ

  • दर्शनी ठिकाणी संविधान उद्देश पत्रिका

  • १४० वर्षांतील नामवंत वकिलांचे चित्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news