Nashik | डिजिटल परिवर्तनाचा खर्च झेपावणार 4 ट्रिलियन डॉलरपर्यंत

तंत्रज्ञान स्वीकारातील दरी भरून काढताना कंपन्यांकडून चार टप्प्यांवर अधिक भर
Digital transformation
डिजिटल परिवर्तनPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: डिजिटल वर्चस्वाची शर्यत साऱ्या जगभर जोरात सुरू झालेली आहे. जागतिक स्तरावर अनेक कंपन्या एआय, ऑटोमेशन आणि क्लाउड कॉम्प्युटींग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये प्रचंड प्रमाणात निधीची गुंतवणूक करत आहेत.

Summary

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) नुसार, जागतिक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठीचा (डीएक्स) म्हणजेच डिजीटल परिवर्तनाचा खर्च 2027 पर्यंत 4 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

डिजिटल सुधारणांच्या तुलनेत डिजिटल परिवर्तनांचे महत्व हे खुप व्यापक आणि विस्तृत आहे. सुधारणा या एका गतीने वाढत असतात; मात्र परिवर्तनांची गती ही दुप्पट, तिप्पट, चौप्पट अशा सुसाट वेगाने होत चालली आहे. करमणुकीच्या सध्याच्या विश्वात झालेले बदल हे याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. नेटफ्लिक्स, अँमेझॉन किंवा स्पॉटीफायव्दारे चित्रपट आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ग्राहकांना त्याच्या वैयक्तिक निवडींचा विचार करत त्यांच्यापर्यंत पोहचविल्याने ते लोकप्रिय ठरले आहेत

गार्टनरच्या अहवालानुसार तब्बल 91 टक्के व्यवसाय आपल्या कामकाजासाठी डिजिटल उपक्रमाच्या विविध स्वरूपात वापर करत आहेत, तर व्यवसायातील वरिष्ठ पातळीवरील 87 टक्के अधिकारी डिजिटलायझेशनला प्राधान्य देत आहेत. डिजीटल तंत्रज्ञानाचा अचूक परिणाम साध्य करण्यासाठी त्याचा अचूक आणि योग्य पध्दतीने वापरावर अधिक काम करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा अचुक वापर करणारा मानवी घटक, प्रक्रियेत प्रत्यक्ष झालेली सुधारणा आणि व्यवस्थेला प्रत्यक्ष होत असलेला लाभ याव्दारे एखाद्या व्यवस्थेत निर्माण झालेली क्षमता हे यशाचे खरे मोजमाप आहे, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आलेले आहे. तर मॅकिन्से या जगप्रसिध्द कंपनीने प्रसिध्द केलेल्या अहवालात केवळ 30 टक्के डिजिटल परिवर्तने त्यांचे इच्छित परिणाम साध्य करतात, हा महत्वाचा मुद्दा मांडला आहे.

डिजीटल परिवर्तनातील अडथ‌ळे

  • ग्राहक केंद्रस्थानी नसणे: ग्राहकांना संकल्पनेच्या केंद्रस्थानी ठेवले तरच डिजिटल परिवर्तने प्रत्यक्षात कंपन्यांची स्पर्धात्मक क्षमता लक्षणीयरीत्या उत्तम प्रकारे अंमलबजावणी केलेली डिजिटल परिवर्तने अनेकदा उद्योगाचे नेतृत्व करू शकतात.

  • आराखड्यातील त्रुटी: "भविष्याचा वेध" यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी "भूतकाळाचेच अवलोकन करणे" या दृष्टीकोनातून डिजिटल परिवर्तनाची रचना तयार केल्याने ती व्यवसायांना भविष्यासाठी सज्ज करण्यावर आपले लक्ष केंद्रीत करत नाहीत.

  • कर्मचाऱ्यांकडून होणारा विरोध: नोकरीच्या सुरक्षेबद्दलच्या चिंतेमुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या फायद्यांबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा सहभाग अशा परिवर्तनामध्ये कमी होतो.

  • नेतृत्वाची इतरांशी अयोग्य जुळणी: कमकुवत नेतृत्व वचनबद्धता ही नेहमी व्यवस्थापनात प्रभावीपणे बदल घडवून आणण्यात अडथळा ठरतो.

  • कठोर अंमलबजावणी: डिजिटल परिवर्तनाच्या उपक्रमांची अतिशय कठोर अंमलबजावणीत मानवी घटकांचा दृष्टीकोनाच्या अभावामुळे अंशतः च यश पदरी पडते.

तंत्रज्ञान चालनासाठी चार प्रमुख धोरणे

  • पारदर्शकता आणि एकरुपतेतून बदलाचा पाया: डिजिटल परिवर्तनात ग्राहक, कर्मचारी, भागधारकांच्या गरजां समजून घेण्यास प्राधान्य देणाऱ्या कंपन्या यशस्वी होण्याची शक्यता 3.5 पट जास्त असते, हे मॅकेन्सीचे संशोधन सूचित करते.

  • वापर करणाऱ्यानुरुप आराखडाः तंत्रज्ञान वापरणाऱ्या व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या पर्यायांमुळे तंत्रज्ञान स्वीकाराचा दर वाढण्याची त्याचबरोबर संस्थेच्या डिजिटल परिवर्तन धोरणावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

  • कौशल्यातील दरी मिटविणेः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार , 2025 अखेरीस किमान 50% कर्मचाऱ्यांना कौशल्य सुधारण्याची गरज आहे. टाटा मोटर्सने आपल्या कामकाजात सातत्यपूर्ण कौशल्यपुर्ण सुधारणा केल्याने त्यांचा बाजारातील हिस्सा 2020 मधील 4.8 टक्क्यांवरून 2024 मध्ये 14 टक्क्यांपर्यंत वाढला.

  • चॅम्पियनची निर्मितीतून बदलास गती: तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे हे केवळ एका वेळेपुरते कार्य नाही. लवकर प्राप्त केलेले यश साजरे केल्याने सकारात्मक वर्तनाला अधिक मजबूत मिळते आणि इतरांना बदल स्वीकारण्यास प्रेरणा मिळते.

पुनरावलोकन, कार्यशाळा किंवा नियमित अभिप्राय यंत्रणांमुळे तंत्रज्ञान वापरणाऱ्या घटकांना एकमेकांना अनुभव प्रदान करणे आणि नवीन प्रणालींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी प्रोत्साहित करता येते. वेगवेगळ्या संघांमधील "चॅम्पियन" हु़डकून काढल्याने नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारे अंतर्गत समर्थक कंपनीत तयार होत जातात.

एस. वेंकट, सह-संस्थापक, प्रॅक्टस.

नवीन तंत्रज्ञानाच्या अवलंबाची प्रक्रिया सतत सुधारणा आणि अभिप्राय संस्कृतीशी निगडीत असून त्यामुळे तंत्रज्ञानाची दीर्घकालीन अंमलबजावणी सुरु राहते. ज्या संस्था बदलात उत्कृष्ट कामगिरी बजावतात, त्यांची यश मिळवण्याची शक्यता सहा पटीने अधिक असते.

अमित किकाणी, डोहलर ग्रुपचे सीएफओ, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news