नाशिक : श्री रेणुकामाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Sri Renukamata Temple Chandwad : तहसीलदारांच्या हस्ते सपत्नीक पूजा; दर्शनासाठी मोठी गर्दी
Sri Renukamata Temple Chandwad
चांदवड : येथील श्री रेणुकामातेची महाआरती करताना तहसीलदार मंदार कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, राजकुमार संकलेचा, प्रवीण हेडा, राजेंद्र शर्मा, संतोष देवरे. (छाया : सुनील थोरे)
Published on
Updated on

चांदवड : उत्तर महाराष्ट्राची आदिशक्ती असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुकामातेच्या मंदिरात गुरुवारी (दि. ३) चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी व माधवी कुलकर्णी यांच्या हस्ते पूजाविधी करीत घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री रेणुकामातेचे सोने-चांदीच्या आभूषणांची शहरातील रंगमहालातून पालखीमध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री रेणुकादेवीच्या आभूषणांची दररोज सकाळी आठ वाजता रंगमहाल ते मंदिर व सायंकाळी पाच वाजता मातेचे मंदिर ते रंगमहाल अशी पालखी मिरवणूक निघणार आहे. या नवरात्रोत्सवाच्या काळात श्री रेणुकामाता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सकाळी बालरूपात, दुपारी तरुण रूपात व सायंकाळी वयोवृद्ध रूपात आपले रूप बदलत असल्याचे आजवरचे भाकीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी रात्री आठ वाजता चांदवड न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. जोशी व डी. एस. निंबाळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

श्री रेणुकामाता देवी ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव काळात येणाऱ्या भाविकांसाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात अनेक भाविक मंदिराच्या परिसरात यात्रोत्सव संपेपर्यंत घटी बसत असतात. या घटी बसणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्टने मंदिर परिसरात प्रशस्त इमारतीच्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार, सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news