Nashik Cyber Police | नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि स्फोटांच्या बनावट क्लिप्समुळे उडाली खळबळ

Nashik Cyber Police | सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
Cyber Crime Police
Cyber Crime PolicePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणेश संबंधित व्हिडिओ प्रसारित करणे तसेच नाशिकमध्ये स्फोट झाल्याचे भासवणारे बनावट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Cyber Crime Police
Drought Declared Nashik | नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके अधिकृतपणे दुष्काळी घोषित

पहिल्या प्रकरणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणेश संबंधित इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील व्हिडिओ प्रसारित केल्याची बाब समोर आली. दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित सोशल मीडिया खात्यांवरून हे व्हिडिओ प्रसारित झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणात २३ टेलिफोन आयडी, प्रोफाइलधारक आणि मोबाईलधारकांचा उल्लेख असून, संबंधित खात्यांमागील व्यक्तींची ओळख निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.

याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात नाशिकमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचे भासवणारे व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.

Cyber Crime Police
Drought Declared Nashik | नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके अधिकृतपणे दुष्काळी घोषित

'उज्जेन महाकाल' या प्रोफाइलवर दि. ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मूळ व्हिडिओमध्ये फेरफार करून या क्लिप्स प्रसारित करण्यात आल्याचे पोलिस अहवालात नमूद आहे. या पोस्टमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती. याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या सामग्रीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस संबंधित डिजिटल पुरावे, प्रोफाइल आणि मोबाईलधारकांची माहिती तपासत आहेत. दोन्ही प्रकरणातील संबंधित व्यक्तींची ओळख निश्चित करून पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news