

नाशिक : पाईकराव मस्के टोळीचा म्हाेरक्या सराईत गुन्हेगार हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोनु पाईकराव यास रेल्वे स्टेशन परिसरातून नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक रोड येथील गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीच्या पोटाला पिस्तुल लावून त्याच्या खिशातून ११०० बळजबरीने काढुन घेतले व फिर्यादी यांचे डोक्यात धारधार हत्याराने वार करून पळून गेला होते. तेव्हापासून या आरोपीचा शोध सुरू होता. अंमलदार अजय देशमुख, विशाल कुंवर यांना मिळालेल्या माहितीनुसार हर्ष सुरेश म्हस्के व टोनू म्हस्के हा रेल्वेस्टेशन परिसरात आला होता. त्यानुसार नाशिक रोड पोलिस ठाण्याचे पथक कारवाई करण्यासाठी आल्याचे पाहुन त्याने पलायन केले. पथकाने त्याचा पाठलाग करत गुलाबावाडी मालधक्कारोड येथे त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. सदर कारवाईत पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, योगेश रानडे, गोवर्धन नागरे, संतोष पिंगळ यांनी सहभाग घेतला.