Nashik Crime News | इन्स्टाग्रामवरील 'भास्क्या डॉन' तुरुंगात

इन्स्टाग्रामवरील 'भास्क्या डॉन' तुरुंगात
Crime
Crime newsPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर रिल तयार करीत त्यात धारदार शस्त्र दाखवणाऱ्या भास्क्या डॉनला गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. पेठ रोडवरील तवली फाटा परिसरात पोलिसांनी ही कारवाई करीत चौघांना पकडले आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शस्त्रे दाखवून दहशत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर शहर पोलिसांची नजर आहे. त्यासाठी सायबर पेट्रोलिंग केली जात असते. त्यात संशयित भास्कर एकनाथ ब्राह्मणे (रा. तवली फाटा) याचा वाढदिवस असताना त्याच्या मित्रमंडळींनी रिल तयार करीत इन्स्टाग्रामवर टाकले. त्यात हॅशटॅग डॉन, ३०७, भास्क्या डॉन असे लिहून धारदार शस्त्रासह व्हिडिओ टाकून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यानंतर गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चौघांना पकडले. त्यात सूरज मेहंदळे, नितीन लिलके, भास्कर ब्राह्मणे, वसंत जणाटे (सर्व रा. तवली फाटा) यांना पकडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news