Nashik Crime News | बजरंगवाडीतील युवकाकडून एक लाखाचे एमडी जप्त
नाशिक : एमडी या अमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोहीम उघडलेली असतानाही अमली पदार्थांची होणारी आयात थांबायला तयार नाही. शहराच्या मध्यवस्तीत नाशिक- पुणेरोडवर एक लाखाचा एमडी साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
दि. 14 जुलै रोजी घडलेल्या दोन टोळ्यांतील फ्री स्टाइल दंगलीत पोलिस अंमलदाराचा सहभाग उघड झाल्यानंतर आता याच टोळीतील राहुल ब्राम्हणे या संशयिताकडे 19 ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाखाचा एमडी साठा जप्त केला. ब्राम्हणेविरोधात अंमली पदार्थविरोधी पथकाने गुन्हा दाखल करत अटक केली. अमली पदार्थविरोधी विशेष पथकातील पोलिस हवालदार संजय ताजणे, पोलिस अंमलदार योगेश सानप, चंद्रकांत बागडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार राहुल ब्राह्मणे (20, रा. 12 खोल्या, महादेव मंदिराजवळ, बजरंगवाडी, नाशिक) हा शुक्रवारी (दि. 16) दुपारी 12.30 च्या सुमारास इस्कॉन मंंदिर रोडलगत, नासर्डी नदीच्या बाजूला वटाणेवाडी येथील चिंचेच्या झाडाखाली एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानंतर पथकाने सापळा रचून ब्राम्हणेला शिताफीने अटक केली. त्याच्या झडतीत 19 ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाखाचे एमडी मॅफेड्रॉन सापडले. याशिवाय मोबाइलही पथकाने ताब्यात घेतला. ब्राम्हणेविरोधात मुंबई नाका ठाण्यात हवालदार संजय ताजणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक नागरे अधिक तपास करीत आहेत.
ब्राम्हणेला अटक केल्यानंतर जुबीन सय्यद आणि त्याच्या गँगच्या मागावर पोलिस आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक देवकिसन गायकर, पोलिस हवालदार भारत डंबाळे, पोलिस नाईक बळवंत कोल्हे, पोलिस अंमलबदार बाळा नांद्रे, चंद्रकांत बागड, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, येवले, भड व सर्व अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिस कर्मचार्यांनी केली.