

नाशिक : नाशिक जिल्ह्यात जबरी चोरी, दंगा, आमर्र्अॅक्ट, एनडीपीएस, पोक्सो दरोडा तयारी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या मालेगाव, इगतपुरी येथील तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए ('MPDA' (Maharashtra Prevention of Dangerous Activities)) अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.
जिल्हा हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणार्या सराईत गुन्हेगारांवर वचक व गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. यात मोहम्मद बेलाल मोहम्मद आजम उर्फ बिलाल (22, रा. रोशर सायजिंग समोर, जाफरनगर, मालेगाव), नदीम खान मुबारक खान उर्फ नंद्या (28, रा. आयशानगर, मालेगाव, सचिन सुभाष म्हसणे (24, रा. फांगुळगव्हाण, इगतपुरी, यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ही जिल्हाधिकारी करण्यात आली आहे.