Nashik Crime News | तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण; दोन मुले, मुलीचा समावेश

नाशिक : तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण; दोन मुले, मुलींचा समावेश
अपहरण
अपहरणfile photo
Published on
Updated on

नाशिक : शहर व परिसरात मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच असून, वेगवेगळ्या भागांत राहणारी आणखी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. त्यात दोन मुलांसह मुलीचा समावेश असून, या तिघांचे अपहरण अज्ञातांनी केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पंचवटी, अंबड आणि नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पेठ रोड भागातील रहिवासी असलेला अल्पवयीन मुलगा बुधवार (दि. २१) पासून बेपत्ता आहे. तो सकाळच्या सुमारास घराबाहेर गेला, अद्याप घरी परतला नसून, त्याचे कुणीतरी अपहरण केल्याचा संशय कुटुंबीयांनी वर्तविला आहे. याबाबत त्याच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा मुलगा सिडको भागातून बेपत्ता झाला. माउली लॉन्स परिसरात राहणारा मुलगा बाहेरून जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता, तो अद्याप परतला नाही. त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज असून, या प्रकरणी पालकांनी पोलिसांत धाव घेतली. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिसरा प्रकार नाशिक रोड भागात घडला. मावशीच्या घरून टीव्हीचा रिमोट घेऊन येते असे सांगून घराबाहेर गेलेली अल्पवयीन मुलगी अद्याप घरी परतली नाही. ती शुक्रवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास घराबाहेर गेली. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळाली नसल्याने तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news