Nashik Crime News | हौसेसाठी 'स्कॉच'चा साठा ; एक्साईजने टाकला छापा

Nashik : सिडकोतील एकाच्या घरातून महागड्या स्कॉचचा साठा जप्त; गुन्हा दाखल
सिडको, नाशिक.
नाशिक : संशयिताने घरात साठवलेला मद्यसाठा.(छाया : राजेंद्र शेळके)
Published on
Updated on

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) केलेल्या कारवाईत सिडकोतील एकाच्या घरातून महागड्या स्कॉचचा साठा जप्त केला आहे. त्यात सैन्य दलासाठी असलेल्या मद्यसाठ्याचाही समावेश असून काही मद्यसाठा दादरा नगर हवेली निर्मित मात्र महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला आढळून आला. संशयिताने हौसेखातर घरात हा मद्यसाठा जमा केल्याचे आढळून आले.

सिडको, नाशिक.
नाशिक : अवैध देशी मद्य कारखान्यावर छापा, १ कोटीचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती देवळाली कॅम्प येथून फक्त सैन्यदलासाठी वापरण्यात येणारा मद्यसाठा अवैधरित्या सिडकोत आणत असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी पथकाने सापळा रचून लेखानगर येथे वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी एमएच १५ जेडी ८९१० क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात सैन्य दलासाठी असलेला मद्यसाठा आढळला. पोलिसांनी संशयित विकी सुधीर बटविया (४४, रा. काशिको नगर, सिडको) याला ताब्यात घेत चौकशी केली असता हा मद्यसाठा तो घरी नेत असल्याचे समजले. त्यामुळे पथकाने घरझडती घेतली असता घरातही स्कॉचचा साठा आढळून आला. सखोल तपासात हौसेखातर, तसेच पार्टी असेल त्यावेळी मद्यसेवनासाठी मद्यसाठा केल्याची कबुली बटाविया याने दिली. विना परवाना क्षमतेपेक्षा जादा मद्यसाठा केल्याने बटाविया यांच्याविरोधात विभागाचे जवान रॉकेश पगारे यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. निरीक्षक आर. जे. पाटील हे तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news