Nashik Crime | दोन हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यास अटक

चांदवड तालुक्यातील घटना
Caught red-handed
दोन हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यास अटकPudhari file photo
Published on
Updated on

चांदवड : खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ७/ १२ वर लावण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना तालुक्यातील रायपूर सजाचे मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद (५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

तालुक्यातील तक्रारदाराने काळखोडे येथे जमीन खरेदी केली होती. त्यांची ७/१२ वर नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी वाकी (खुर्द) येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज मंजुरीसाठी रायपूर सजेचे मंडल अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्याकडे आला होता. प्रकरणाच्या चौकशीसाठी तक्रारदार हे मंडल अधिकारी प्रसाद यांच्याकडे बुधवारी (दि. १२) गेले असता त्यांनी नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी (दि. १३) रोजी वाकी (खुर्द) येथे एसीबी पथकाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सापळा रचत मंडल अधिकारी प्रसाद यांना दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news