

देवळाली कॅम्प (नाशिक) : येथील चंद्रमणी (नागझीरा) चौफुली येथे सापळा लावून रोहीत गणेश वैरागर, (वय २२, रा. साठे नगर, वैतागवाडी) यास सार्वजनिक शौचालयासमोर हातात धारदार कोयता बाळगुन असताना अटक करण्यात आली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, साहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, नाशिक शहर यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. गुन्हे शाखा, युनिट क्र. २ कडील पोलिस उपनिरिक्षक मुक्तारखान पठाण व साहा. पोलिस उपनिरिक्षक गुलाब सोनार यांना देवळाली कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना चंद्रमणी (नागझीरा) चौफुली या ठिकाणी एक इसम हातात धारदार कोयता बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदरची बातमी त्यांनी साहा. पोलिस निरिक्षक हेमंत तोडकर यांना कळविली असता त्यांनी माहितीची खात्री करून कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, पोलिस हवालदार वाल्मीक चव्हाण यांच्या पथकाने चंद्रमणी (नागझीरा) चौफुली येथे सापळा लावून रोहीत वैरागर यास ताब्यात घेतले. त्याच्यावर शस्त्रबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन केले असल्याने देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व म.पो. का. क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानदार, विक्रेत्यांकडून खंडणी लुटणाऱ्या त्रिकुटाला बेड्या
नाशिक: नाशिकरोड परिसरात कोयते आणि तलवारी फिरवत दहशत माजवणाऱ्या कुख्यात कोयता गँगचा अखेर नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करीत पर्दाफाश केला. धारदार हत्यारे आणि जबरी चोरीसाठी वापरलेली साधने जप्त करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.
राकेश उर्फ राका लोंढे, प्रज्वल उर्फ पज्या गुंजाळ, प्रथमेश उर्फ नन्या शेलार ही ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे होय. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली देत वापरलेले धारदार शस्त्रे, मोटारसायकली आणि लुटलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी १३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता म्हसोबा मंदिराजवळील शिवाजीनगर–जेलरोड परिसरात सात ते आठ मुखवटाधारी संशयितांनी हातात लोखंडी कोयते, तलवारी व इतर घातक शस्त्रे घेऊन गाड्यांची तोडफोड करत स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या टोळीने फळविक्री करणारे धनंजय सागवान (वय १८) यांना धमकावत त्यांचा मोबाईल, घड्याळ व चैन हिसकावून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर आरोपींचा शोध घेत असताना तपासादरम्यान पोलिस हवालदार विशाल पाटील व पोलिस अंमलदार महेंद्र जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. आरोपी साईनाथ नगरच्या मोकळ्या मैदानी भागात १५ नोव्हेंबरला दुपारी एकत्र येणार होते. आरोपी रिक्षात आल्यानंतर पोलीस हवालदार पाटील व इतर पोलीस कर्मचारी प्रवासी म्हणून त्यांच्यासोबत बसले व तिघांना जेरबंद केले. उर्वरित आरोपींचा शोध सपोनि प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.