चांदवड : रात्रीच्या वेळी अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक चांदवड पोलिसांनी तपासणी मोहिमेत पकडत त्यातील ४७ लाख ५७ हजार ६२४ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड – मनमाड रोडने अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक होणार होती. सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या पथकाने चौफुलीवर सापळा रचत रात्री 12.30 च्या सुमारास आयशर ट्रक (एमएच १८, बीए ३५५५) हा चांदवडकडून मनमाडकडे जात असताना रोखला. ट्रक तपासला असता त्यात ४७ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.