Nashik Crime | देवळा पोलिसांकडून मॉडीफाईड मोटारसायकली ताब्यात ; गुन्हे दाखल

आवाज मोठा करण्यासाठी सायलेंसरमध्ये बेकायदेशिर बदल
Nashik Crime
Nashik Crime
Published on
Updated on

देवळा ; देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दि ( १०) रोजी देवळा शहरात व हद्दीत वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करुन मॉडिफिकेशन केलेल्या बुलेट मोटारसायकली ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेत तपासणीदरम्यान एकुन ४ बुलेट मोटारसायकली आढळुन आल्या ज्यामध्ये सायलेंसरमध्ये बेकायदेशिर बदल, मोठ्या आवाजाचे (Modified silencer) वापर, तसेच आरटीओच्या नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित वाहनचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कललमान्वये गुन्हे दाखल करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली व सदर मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मॉडीफाईड मोटारसायकली ताब्यात घेवुन गुन्हे दाखल तसेच मॉडीफाईड सायलेंसर काढुन घेवुन ते नष्ट करण्यात आले आहेत.

तसेच सदर युवकांच्या पालकांना तसेच युवक यांना देखील पोलीस ठाण्यात हजर येथे करण्यात येऊन त्यांना यापुढे अशा प्रकारचे कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर वापरु नयेत याबाबत समज देण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारे आपल्या वाहनांमध्ये कोणतेही बेकायदेशिर बदल करु नयेत, अन्यथा अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल तसेच वाहनधारकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.असे आवाहन पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी यावेळी केले .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, पो.उप.नि हेंमत राऊत, पो.कॉ. संदीप चौधरी, शरिफ शेख, दिलीप सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news