Nashik Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून BMC अधिकाऱ्याचा खून; प्रेयसीसह दोन्ही मुलांना अटक

न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
Nashik Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून BMC अधिकाऱ्याचा खून; प्रेयसीसह दोन्ही मुलांना अटक
Published on
Updated on

नाशिक : वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरुडेश्वर येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ५३ वर्षीय स्वच्छता निरीक्षकाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित प्रेयसीसह तिच्या दोन मुलांना अटक केली असून, न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राधाकिसन तुकाराम वारघडे (५३, रा. गरुडेश्वर, ता. इगतपुरी) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. तर किरण कुंदे (२२), दीपक कुंदे (२६) आणि वंदना कुंदे (४५, सर्व रा. गरुडेश्वर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गणपती उत्सवानिमित्त वारघडे हे पत्नी, दोन मुली व मुलासह गरुडेश्वर येथे आले होते. उत्सवानंतर कुटुंबीय मुंबईला परतले. मात्र, सोमवारी ते पुन्हा एकटेच गावात आले. २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री एकच्या सुमारास ते वंदना कुंदे यांच्या घराजवळ तिच्याशी बोलत होते. हा प्रकार पाहिल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांचा संताप झाला. संशयातून तिघांनी संगनमत करून वारघडे यांना घराजवळ पकडले आणि मारहाण केली. त्यानंतर डोक्याच्या मागील बाजूस धारदार अथवा दणकट हत्याराने जोरदार प्रहार केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मृताचे पुतणे कुणाल वारघडे (२५, रा. देऊळवाडी) यांच्या फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्या. परीविक्षाधीन उपअधीक्षक योगेश म्हस्के पुढील तपास करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news