

नाशिक : तब्बल 400 कोटी रुपयांची रोकड घेऊन जात असलेल्या कथित कंटेनर लूट प्रकरणी कर्नाटक पोलिस शुक्रवारी (दि.23) नाशिकमध्ये दाखल झाल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. नाशिकमधील संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून कर्नाटक पोलिस नाशिकमध्ये दाखल झाले आहे. ग्रामीण पोलिसांच्या मदतीने तपास केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. एक संशयित बिल्डर अद्यापही फरार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी एसआयटी नेमल्याने सत्यता समोर येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईतून दक्षिण भारतात जाणारा 400 कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेला कंटेनर लुटीचा प्रकार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात चर्चेत आहे. या घटनेचे धागेदोरे घोटीपर्यंत पोहोचल्याने नाशिक ग्रामीण पोलिस या प्रकरणाच्या तपासात उतरले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी ट्रकचालक संदीप पाटील याचे विराट सतीश गांधी, जयेश कोडींराम कदम, सुनील गंगाराम धुमाळ, जर्नादन भीमराव धायगुडे, विशाल सुब्रमण्यम या प्रकरणातील
‘ते’ साहेब कोण
कथित 400 कोटी नोटा लूट प्रकरणात राजकीय साहेबांचा हात असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिस मुख्यालयात सध्या या प्रकरणावर विचारमंथन सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे. कर्नाटक ते नाशिक, घोटीमार्गे उलगडत जाणाऱ्या या प्रकरणात वेगवेगळी वळणे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता साहेबांचे नाव समोर येत असल्याने प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.