Nashik Crime | अपहृत मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरी

१४ वर्षीय मुलीचे अपहरण करीत तिच्यावर गुजरातमध्ये अत्याचार
20 years rigorous imprisonment for sexually assaulting a 5-year-old child
अपहृत मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. Pudhari FIle Photo
Published on
Updated on

नाशिक : नाशिक रोड परिसरातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करीत तिच्यावर गुजरातमध्ये अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सागर संतोष वाघ (२७, रा. हिंगणवेढे, नाशिक रोड) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर वाघने दि. १५ मे २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास पीडितेचे अपहरण केले होते. तिला गुजरात राज्यात नेत हॉटेलमध्ये अत्याचार केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात सागरविरोधात पोक्सोसह अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. लीना चंद्रकांत चव्हाण यांनी युक्तिवाद केला. सागर विरोधात गुन्हा शाबित झाल्याने विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी सागरला २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला अंमलदार धनश्री एस. हासे, श्रेणी उपनिरीक्षक एस. आर. शिंदे, मोनिका तेजाळे यांनी कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news